भोपाळ: सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच रावत यांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारने बुलडोझर चालवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसा आरोपच रावत यांच्या मेव्हण्याने केला आहे.
बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे बंधू यशवर्धन सिंह हे मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यात राहतात. सोहापूर येथे त्यांची जमीन आहे. मध्य प्रदेश सरकारने कोणतीही नोटीस न बजावता त्यांची जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप यशवर्धन यांनी केला आहे. यशवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून काँग्रेस सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.
मोठी बहीण मधुलिका यांचं निधन झाल्याने यशवर्धन हे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत आले होते. ते दिल्लीत असतानाच मध्य प्रदेश सरकारने त्यांची जमीन ताब्यात घेतली. त्याबाबत यशवर्धन सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. ज्या दिवशी बिपीन रावत आणि बहीण मधुलिका यांचं अंत्यसंस्कार केलं जात होतं. त्याच दिवशी माझ्या जमिनीवर ताबा मिळवण्यात आला. माझ्या खासगी जमिनीवर मी बांधकाम केलं होतं. हे बांधकाम अवैध असल्याचं सांगून त्यावर बुलडोझर फिरवण्यात आला. झाडे तोडण्यात आली. राष्ट्रीय महामार्गासाठी हे सर्व केले गेले. आम्ही त्यात हस्तक्षेप केल्याने आमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही न्याय मागत आहोत, असं यशवर्धन यांनी म्हटलं आहे.
शहडोलजवळ राजाबाग सोहागपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. त्यासाठी खासगी जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. यात यशवर्धन यांच्या जमिनीचाही समावेश आहे. आमच्या खासगी जमिनीचं अधिग्रहण झालेलंच नाही, तरीही त्यावर ताबा मिळवला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला. आमचं कुटुंब दिल्लीत होतं. तेव्हा ठेकेदार मनोज दीक्षित यांचा फोन आला. त्यांनीच मला जमीन संपादीत केल्याचं सांगितलं. दसऱ्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी जमिनीचं अधिग्रहण होणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी हे प्रकरण मला कळलं असून त्याची चौकशी करण्याचे आदेश तहसिलदारांना दिली आहे, असं सांगितलं.
दरम्यान, काँग्रेसचे मध्यप्रदेशचे सचिव केके मिश्रा यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. ज्या दिवशी रावत यांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्यांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर ताबा मिळवण्यात आला ही संतापजनक बाब आहे. देशाच्या अस्सल हिरोचा या पेक्षा दुसरा काय अवमान असू शकतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूज |14 December 2021#FastNews pic.twitter.com/kTNjjeLW43
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2021
संबंधित बातम्या:
सावधान… गोरे दिसण्यासाठी तुम्ही वापरत आहात स्किन व्हाइटिंग क्रीम; या क्रीमने होऊ शकतं त्वचेचं नुकसान
’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश