नवी दिल्ली : G20 शिखर परिषद समाप्त झाली आहे. पण सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी समोर आलीय. G20 परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांची वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली होती. चायनीज डेलिगेशन ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरलं होतं. यावेळी चायनीज डेलिगेशनने एक रहस्यमयी बॅग सोबत आणली होती. त्यावरुन मोठा गदारोळ झाला. ताज पॅलेस हॉटेलमध्ये जवळपास 12 तास हाय वोल्टेज ड्रामा चालला. ब्राझीलच डेलिगेशन सुद्धा ताज पॅलेस हॉटेलमध्ये मुक्कामाला होतं. भारताने ही शिखर परिषद यशस्वी करुन दाखवली. जगातील बड्या राष्ट्रांचे प्रमुख G20 परिषदेसाठी देशात आले होते. चायनीज डेलिगेशनमधील एका मेंबरकडे रहस्यमयी बॅग होती. प्रोटोकॉलनुसार, हॉटेलच्या सिक्युरिटीने ती बॅग चेक केली नाही.
त्यानंतर हॉटेल स्टाफने दिल्ली पोलीस आणि सुरक्षा पथकांना बॅगमधील एका आगळ्यावेगळ्या डिवाइसची माहिती दिली. सुरक्षा पथकांनी चायनीज डेलिगेशनला बॅगला स्कॅनरमध्ये टाकण्याची विनंती केली. पण चायनीज डेलिगेशनमधील मेंबरने नकार दिला. जवळपास 10 ते 12 तास या बॅगवरुन मोठा गदारोळ चालला. सुरक्षा पथक 12 तास त्या खोलीबाहेर उभं होतं. जी 20 शिखर परिषद रविवारी संपली. त्यानंतर आता ही बातमी समोर आलीय. बऱ्याच प्रयत्नानंतर हा गोंधळ शांत झाला. ती बॅग चिनी दूतावासामध्ये पाठवून देण्यात आली.
चीनकडून जिनपिंग नाही, मग कोण सहभागी झालेलं?
9-10 सप्टेंबरला दिल्लीत G20 शिखर परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या परिषदेत सहभागी झाले नाहीत. त्यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी सहभाग घेतला. या समिट दरम्यान भारताने अनेक देशांबरोबर मोठ्या डील केल्या. त्यामुळे चीनच टेन्शन वाढलं आहे. G 20 परिषदेदरम्यान भारताची वाढती ताकत पाहून चीनला नक्कीच धक्का बसला आहे. चिनी राष्ट्रपती या परिषदेत सहभागी झाले नाहीत, त्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी काही प्रश्न विचारले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सुद्धा जिनपिंग यांच्या सहभागी न होण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली होती.