नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध आठव्या दिवशी सुरु आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मयादेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा (Operation Ganga) सुरु केलं आहे. या मोहिमेद्वारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना देशात परत आणलं जातं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 22 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या मोहिमेअंतर्गत 6200 भारतीयांना देशात परत आणण्यात आलं आहे. तर येत्या दोन दिवसात विशेष मोहिमेत 7400 भारतीय नागरिकांनी देशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवसांपर्यंत नियमित विमान सेवा पुरवणाऱ्या सेवांमधून 13 हजार 600 हून अधिक भारतीय मायदेशी परतलेले असतील. आणि भारतीय हवाई दलाच्या विमानसेवेतर्फे 1500 नागरिक भारतात येतील. परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय भारतीयांना देशात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 22 फेब्रुवारीपासून आजपर्यंत 6200 जणांना मायदेशी परत आणण्यात आलं. यूक्रेन रशिया यांच्यातील युद्धामुळं यूक्रेनमधील विमानतळ बंद आहेत.त्यामुळं यूक्रेन शेजारील देशातून भारतीयांना परत आणलं जात आहे. रोमानियातील बुखारेस्टमधून 5 विमानं,हंगेरीतीलल बुडापेस्टमधून 1, पोलंडमधील झेझोहून येथून 2 आणि भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांनी भारतीयांना परत आणण्यात येत आहे. आगामी दोन दिवसात विमानांची संख्या वाढवली जाईल आणि भारतीयांना परत आणलं जाणार आहे. 4 मार्चला 3500 तर 5 मार्चला 3900 व्यक्तींना भारतात आणण्यात येणार आहे.
तारीख | विमानसेवा | विमामनतळ | भारतीय विमानतळ | ईटीए | विमान फेऱ्या |
---|---|---|---|---|---|
04.03.2022 | एअर इंडिया एक्सप्रेस | बुचारेस्ट | मुंबई | January 1, 1970 | 1 |
एअर इंडिया एक्सप्रेस | बुडापेस्ट | मुंबई | January 1, 1970 | 1 | |
एअर इंंडिया | बुचारेस्ट | नवी दिल्ली | January 1, 1970 | 1 | |
स्पाईस जेट | कोसी | नवी दिल्ली | 11:20:00,14:10 | 2 | |
इंडिगो | बुडापेस्ट | नवी दिल्ली | 04:40, 08:20 | 2 | |
इंडिगो | रेझेझोव | नवी दिल्ली | 08:20, 05:20, 06:20 | 3 | |
इंडिगो | बुचारेस्ट | नवी दिल्ली | 02:30, 03:40, 04:40 | 3 | |
इंडिगो | सुईसेव्हा | नवी दिल्ली | 04:05,05:05 | 2 | |
विस्तारा | बचारेस्ट | नवी दिल्ली | January 1, 1970 | 1 | |
गो फर्स्ट | बुडापेस्ट | नवी दिल्ली | January 1, 1970 | 1 |
Brave Indian Airliners flying high to bring back stranded Indian nationals
✈️Air India Express @airindiain
✈️ IndiGO @IndiGo6E
✈️ Spice Jet @flyspicejet #OperationGanga #UkraineRussianWar #Ukraine pic.twitter.com/qJZQ4EraDe— PIB India (@PIB_India) March 3, 2022
ऑपरेशन गंगा द्वारे भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं व्यावसायिक विमान सेव पुरवणाऱ्या कंपन्यांचं सहकार्य घेतलं आहे. एअर इंडिया एकस्प्रेस, इंडिगो आणि स्पाईस जेट यांच्यावतीनं संयुक्त मोहीम राबवल जात आहे.यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय हवाई दलाचं देखील सहकार्य घेण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानाचा वापर करण्यात येत आहे. हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग हे चार मंत्री यूक्रेनच्या जवळी देशांमध्ये उपस्थित असून ऑपरेशन गंगावर लक्ष ठेऊन आहेत.
Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?