India : भारत पुन्हा जगाच्या केंद्रस्थानी? चीन-इंग्लंड-अमेरिका-रशियाच्या टॉप मास्टर्सची दिल्लीवारी

| Updated on: Apr 01, 2022 | 5:14 PM

अमेरिकेला भारतानं रशियाविरोधी भूमिका घ्यावी, असं वाटलं होतं. भारतानं रशिया आणि यूक्रेन यांना त्यांच्या प्रश्न शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यास सांगितलं. भारतानं थेट रशियाच्या विरोधात भूमिका घेतली नाही किंवा समर्थनात बाजू घेतली नाही.

India : भारत पुन्हा जगाच्या केंद्रस्थानी? चीन-इंग्लंड-अमेरिका-रशियाच्या टॉप मास्टर्सची दिल्लीवारी
अमेरिका, रशिया आणि यूकेचे प्रमुख नेते भारत दौऱ्यावर
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यात गेल्या 37 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. यूक्रेन नाटोत सहभागी होऊ शकतो आणि नाटोचं सैन्य आपल्या देशाच्या सीमेपर्यंत पोहोचेल या भीतीमुळं रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. रशियानं यूक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख केली आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेसह यूरोपियन देशांनी रशिया विरोधात भूमिका घेतली. रशियानं वेटो वापरत त्यांच्या विरोधातील प्रस्ताव फेटाळून लावले. जगभरात हे सर्व घडत असताना जगाचं लक्ष भारताच्या (India) भूमिकेकडं लागलं होतं. अमेरिकेला भारतानं रशियाविरोधी भूमिका घ्यावी, असं वाटलं होतं. भारतानं रशिया आणि यूक्रेन यांना त्यांच्या प्रश्न शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यास सांगितलं. भारतानं थेट रशियाच्या विरोधात भूमिका घेतली नाही किंवा समर्थनात बाजू घेतली नाही. या पार्श्वभूमीवर भारतानं आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपली बाजू भकक्म केलीय. अमेरिका, रशिया, जर्मनी, यूनायटेड किंग्डम आणि चीन या देशांचे परराष्ट्र विभागाचे अधिकारी भारताचा दौरा करत आहेत.

जयशंकर यांची रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याशी भेट

भारताच्या परराष्ट्र धोरणाला मजबूत करण्याचं काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करत आहेत. भारतानं जगासमोरील प्रश्न शांततेच्या आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची भूमिका घेतली आहे. यूएन चार्टर आणि त्याच्या मूल्याचं पालन केलं जावं, प्रादेशिक एकता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे अशी भूमिका भारतानं जर्मनीचे वरिष्ठ नेते जेन्स प्लॉन्टर यांच्यासमोर मांडली. रशियाचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार होते त्या पार्श्वभूमी जर्मनीच्या टॉप नेत्यांनी भारताशी चर्चा केली.

जयशंकर यांची आणि जर्मनीच्या अधिकाऱ्यांशी भेट

यूकेच्या परराष्ट्र सचिव देखील भारतात

यूकेच्या परराष्ट्र सचिव एलिझाबेथ थ्रुस आणि अमेरिकेचे उपसचिव दलीप सिंग यांनी बुधवारी भारतीय परराष्ट्र मंत्र्यांशी रशियाचं यूक्रेनवरील आक्रमण या मुद्द्यावर चर्चा केली.

तर, रशिया भारताच्या बाजून उभं राहणार नाही : दलीप सिंग

रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरजी लावरोव्ह भारतात पोहोचण्यापूर्वी अमेरिकेचे उपसचिव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी रशिया आणि भारतासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशिया आणि चीन हे एकत्र आहे. चीन ज्यावेळी लॉईन ऑफ अॅक्शनचा भंग करेल त्यावेळी रशिया भारताच्या येईल, असं वाटत नसल्याचं दलीप सिंग म्हणाले.

आपण शत्रू कमी भागीदार जास्त, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे 25 मार्च ते 29 मार्च दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारत आणि चीनच्या सैन्यात गलवानमध्ये झटापट झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले होते. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात भूमिका घेण्यापेक्षा दोन्ही देशांनी भागीदार म्हणून काम करणं आवश्यक असल्याचं वांग यी म्हणाले होते. भारत आणि चीन हे शत्रू असण्याऐवजी चांगले भागीदार असल्याचं वांग यी म्हणाले.

इतर बातम्या :

आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्या, गोळ्या घाला…; मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर येणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

Ukraine attack on Russia : यूक्रेनचा रशियावर पलटवार, ऐतिहासिक बेलगोरोडमधील ऑईल डेपोवर हल्ला, पाहा व्हिडीओ