G-20 च्या आयोजनावर रशियाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

| Updated on: Sep 10, 2023 | 4:21 PM

G20 summit : रशियाने भारतात आयोजित G20 संमेलनाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, भारताने पहिल्यांद आयोजन करुन इतिहास रचला आहे.

G-20 च्या आयोजनावर रशियाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
Follow us on
G-20 summit 2023 : भारतात जी 20 शिखर संमेलनाचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की “अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. हे शिखर संमेलन एक मैलाचा दगड होता. मी भारताच्या नेतृत्वात आयोजित संमेलनाचा उल्लेख करु इच्छितो. कारण इतिहासात पहिल्यांदा ग्लोबल साऊथमधून ही नेत्यांना एकत्र केले.
PM मोदींनी G20 शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा केली. ते म्हणाले की, आशा आणि शांतता जगभर पसरली पाहिजे. “प्रत्येकाचं कल्याण होवो या शुभेच्छा देऊन पंतप्रधान मोदींनी G20 परिषदेचा समारोप केला.

#WATCH | भारत में जी 20 शिखर सम्मेलन | रूसी विदेश मंत्री सर्गेई लावरोव ने कहा, “अभी एक लंबा सफर तय करना है लेकिन यह शिखर सम्मेलन एक मील का पत्थर रहा है… मैं भारतीय अध्यक्षता की सक्रिय भूमिका का भी उल्लेख करना चाहूंगा जिसने इतिहास में पहली बार वास्तव में ग्लोबल साउथ से जी 20… pic.twitter.com/cIPZBRCrvr

— ANI_HindiNews (@AHindinews) September 10, 2023

a-expanded=”false”>

आज ‘वन फ्युचर’ या शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रादरम्यान G20 गटाच्या सदस्यांनी चर्चा केली. G20 शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी कॅनडा, तुर्की, UAE आणि दक्षिण कोरिया यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तर सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सोमवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

G20 शिखर परिषदेच्या तिसर्‍या सत्रापूर्वी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक रोपटे सुपूर्द केले.