रस्टी स्पॉटेड आणि ब्लॅक फुटेड, 40 विविध प्राणी खाणाऱ्या सर्वात लहान मनीमाऊ

| Updated on: Jun 27, 2024 | 10:00 PM

घरातील पाळीव मांजरांपेक्षाही या मांजरीचा आकार छोटा आहे. अगदी लहान म्हणजे तळहातात मावण्याइतका.. पण, शिकार करण्यात ह्या मांजरी अगदी तरबेज आहेत. लहान असूनही तब्बल 1.4 मीटर्स म्हणजेच साधारण 4 फुटांहून अधिक उंच उडी मारून पक्षांची देखील शिकार करू शकतात.

रस्टी स्पॉटेड आणि ब्लॅक फुटेड, 40 विविध प्राणी खाणाऱ्या सर्वात लहान मनीमाऊ
Rusty Spotted and Black Footed
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

घरात विविध प्रकारचे प्राणी पाळण्याची लोकांना आवड असते. कुत्रे, मांजर, पोपट, कबुतरे ही घरात पाळले जाणारे प्राणी आणि पक्षी. कुत्रे यांना घराचे रक्षणकर्ता म्हणतात त्याचप्रमाणे हे आपल्या मालकांप्रती निष्ठावान असतात. त्यामुळे अनेक जण घरांमध्ये कुत्रे पाळणे पसंद करतात. त्याखालोखाल घरात प्रामुख्याने पाळला जाणारा प्राणी म्हणजे मांजर. गोंडस आणि मस्तीखोर मनीमाऊ घरातील सर्वाना आवडत असते. शिकार करण्याची मांजरीची अदाही वेगळीच असते. मांजरीच्या या प्रजातीमध्ये दोन अशा मांजरीच्या प्रजाती आहेत की वेगळ्या शिकार करण्याबद्दल त्या प्रसिध्द आहेत. मात्र, आता रस्टी स्पॉटेड आणि ब्लॅक फुटेड या त्या दोन प्रजातीच्या मांजरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पाळीव मांजरी असो की रानमांजरी शिकार करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. शिकार करणे हा गुण त्यांच्यामध्ये असतो. मात्र, यामध्ये रस्टी स्पॉटेड आणि दुर्मिळ ब्लॅक फुटेड या दोन जगातल्या सर्वात लहान मांजरीच्या प्रजाती वेगळ्या आहेत. आपल्या हाताच्या अगदी तळहातामध्ये मावतील इतक्या त्या लहान आहेत. परंतु, शिकार करण्यात या मांजरी अगदी तरबेज आहेत.

जगभरात आफ्रिकन जंगली कुत्रे हे शिकार करण्यात पहिल्या स्थानी आहेत. तर, या शिकारी मांजरी दुसऱ्या स्थानावर आहेत. उंदीर आणि लहान लहान पक्षी हे या मांजरींचा आहार आहे. त्यांचा आकार लहान असला तरी त्यांच्या वजनापेक्षा मोठ्या आकाराच्या सशांचीही त्या शिकार करतात. या दोन्ही प्रजातींच्या मांजरी निशाचर असतात. झाडावर बसून कोणतीही हालचाल क्षणात टिपण्यात त्या तरबेज असतात. ओल्या दमट पानगळीच्या जंगलात यांचे वास्तव्य असते.

रस्टी स्पॉटेड मांजरीची नजर ही मानवाच्या दृष्टीपेक्षा सहापट जास्त असते. तर, ब्लॅक फुटेड मांजर चाळीस प्रकारचे विविध प्राणी खातात. 1.4 मीटर म्हणजे साधारण 4 फुटांहून अधिक उंच उडी मारून पक्षांची शिकार करू शकतात. आशिया खंडातील भारत, नेपाळ आणि श्रीलंकेच्या काही भागात या दोन प्रजातीच्या मांजरी आढळतात. भारतात ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात या मांजरी आढळतात. जगातील सर्वात दुर्मीळ स्पॉटेड मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रजाती आता दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत.