“नौकरी का डर मत दिखाइए, 10 सेकेंड में छोड़ देंगे”; आंदोलनावर महिला कुस्तीपटूंनी ठणकावून सांगितलं…

| Updated on: Jun 05, 2023 | 9:56 PM

साक्षी मलिकच्या पतिनेही फेसबुकवरून म्हटले आहे की, खेळाडूंची आंदोलन संपवल्याच्या खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. कारण काही लोकांना आमचे आंदोलन कमकुवत करायचे आहेत.

नौकरी का डर मत दिखाइए, 10 सेकेंड में छोड़ देंगे; आंदोलनावर महिला कुस्तीपटूंनी ठणकावून सांगितलं...
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त देण्यात आले असले तरी या खेळाडूंनी त्याला दुजोरा दिला आहे. या महिला खेळाडूंनी ट्विट करत हे आंदोलन अजून संपलेलं नसल्याची माहिती या खेळाडूंनी दिली आहे. या आंदोलनाबाबत महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले आहे की, जे आमच्या पदकांची किंमत 15 रुपये सांगत होते, तिच लोकं आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत. ही लोकं आमच्या नोकरीच्या मागं लागले असले तरी आमच्या जीवापेक्षा ही नोकरी मोठी नाही असंही या खेळाडूंनी ठणाकावून सांगितले आहे.

खेळाडूंच्या नोकरीवर अनेक सवाल उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितले की, नोकरी ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. मात्र ही नोकरी आमच्या न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर आम्ही ही नोकरीही सोडू असं साक्षी मलिकने ठणकावून सांगितले आहे.

तर त्याचवेळी साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांनी फेसबुक लाईव्ह करत संप स्थगित करण्याच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्या खोट्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बजरंग पुनियानेही ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे. तसेच पुनिया यांनी आंदोलन मागे घेतल्याच्या वृत्ताचेही त्याने खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही माघार घेत नाही किंवा आंदोलनही मागे घेत नाही.

त्याचबरोबर महिला कुस्तीपटूंनी एफआयआरही रद्द केल्याच्या ज्या चर्चा केल्या जात आहेत, त्या सर्व चर्चा खोट्या असल्याचेही त्यांना यावेळी सांगितले. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही पैलवानांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तर त्याच वेळी साक्षी मलिकच्या पतिनेही फेसबुकवरून म्हटले आहे की, खेळाडूंची आंदोलन संपवल्याच्या खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. कारण काही लोकांना आमचे आंदोलन कमकुवत करायचे आहेत.

त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे असं मत सत्यव्रत कादियानने व्यक्त केले आहे. त्यामुळे या अशा खोट्या बातम्यांकडे कोणीही लक्ष देऊ नका, कारण आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार असल्याचेही या खेळाडूंनी सांगितले.