सलमान खानची हत्या का करायची होती? लॉरेंस बिश्नोई याने NIA ला सांगितले कारण

| Updated on: May 23, 2023 | 3:36 PM

Salman Khan and lawrence bishnoi : सलमान खान याच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. लॉरेंस बिश्नोई याने ही हत्या का करणार होता, त्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेपुढे त्याने कबुलीजबाब दिला आहे.

सलमान खानची हत्या का करायची होती? लॉरेंस बिश्नोई याने NIA ला सांगितले कारण
salman khan lawrence bishnoi
Follow us on

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठी कबुली दिली आहे. सलमान खान याची हत्या का करणार होता? त्याचे कारणही लॉरेन्स बिश्नोई याने सांगितले आहे. या चौकशीत लॉरेन्स बिश्नोई याने फक्त सलमान खान यालाच नाही तर आणखी ९ जणांची हत्या करणार असल्याची कबुली दिली आहे. या सर्वांच्या यादीमध्ये पहिलं नाव सलमान खान याचे होते.

सलमानची हत्या का करणार होता

एनआयएच्या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईने सांगितले की, सलमानला त्याच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर ठेवले आहे. त्याचे कारणही त्याने सांगितले. 1998 मध्ये सलमान खान याने काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे तो सलमान खानवर नाराज होता. 1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू बनला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भाईजानची रेकी करण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवल्याची कबुलीही त्याने दिली

हे सुद्धा वाचा

अतिक, अशरफसंदर्भात खुलासा

लॉरेन्स बिश्नोईचा संबंध उत्तर प्रदेशातील माफिया अन् माजी खासदार अतिक अहमद आणि माजी आमदार अशरफ यांच्या हत्येमध्येही आहे. लॉरेन्स टोळीने अतिक अहमदच्या तीन शूटर्सना पिस्तूल पुरवले होते. अतिक आणि अशरफची हत्या करणारे तीन शूटर बिश्नोईपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही त्यांचे मोठे चाहते होते. सनी, अरुण आणि लवलेश या तिघांनी माध्यमांसमोर दोघांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर ते शरणही आले होते.