लखनऊ : व्हॅलेंटाइन्स डे ला झालेल्या दोन लग्नांची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. ही दोन मुस्लिम महिलांची गोष्ट आहे. एखाद्या चित्रपटाच्या स्किप्टसारख कथानक आहे. दोन मुस्लिम महिलांना त्यांच्या नवऱ्याने घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांच्यावर हलालासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर या महिलांच्या आयुष्यात हिंदू युवकांची एन्ट्री झाली. लव अफेअर सुरु झालं. प्रेमात त्या इतक्या गुंतून गेल्या की, त्या मुस्लिम महिलांनी हिंदू धर्म स्वीकारून प्रियकरासोबत लग्न केलं. या दोन्ही लव्ह स्टोरीज विस्ताराने जाणून घेऊया.
बुलंदशहरात राहणाऱ्या शाहाना आणि बिहारच्या पूर्णियामधील नसीमाची ही गोष्ट आहे. शाहानाच लग्न दोन वर्षांपूर्वी एका मुस्लिम युवकाबरोबर झालं होतं. नवरा काहीच कमाई करत नव्हता. त्याशिवाय त्रास द्यायचा तो वेगळा. त्यामुळे शाहाना नेहमी टेन्शनमध्ये असायची. या दरम्यान तिची ओळख उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये राहणाऱ्या ओमप्रकाश बरोबर झाली. मानसिक दृष्टया त्रस्त झालेल्या शाहानाला ओमप्रकाशचा आधार मिळाला. त्यावेळी तिला बर वाटलं. दोघांमध्ये आधी मैत्रीच नातं झालं. मग प्रेम. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शाहानाने मुस्लिम धर्म का सोडला?
कुटुंबीयांना समजावल्यानंतर दोघांनी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर लग्न केलं. शाहाना आणि ओमप्रकाशने इज्जत नगरमध्ये भीटा नाथ मंदिरात हिंदू पद्धतीने लग्न केलं. शाहानाने मुस्लिम धर्म सोडून सनातन धर्माचा स्वीकार केला. शाहाना आता शारदा म्हणून ओळखली जाते. ओमप्रकाश सारखा जोडीदार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे, असं शारदाने सांगितलं. तीन तलाक आणि हलाला सारख्या प्रथेला कंटाळून मी हे पाऊल उचलल्याच तिने सांगितलं.
हलालासाठी घराबाहेर काढलं
दुसरी गोष्ट नसीमाची आहे. तिची कथा सुद्धा शाहानाशी मिळती-जुळती आहे. दोन वर्षांपूर्वी नसीमाच लग्न आगरा येथे झालं होतं. लग्नानंतर नवऱ्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नानंतर तिला एक मुलगी झाली, जी आता दीड वर्षांची आहे. 6 महिन्यापूर्वी नवऱ्याने तिला तलाक दिला. त्यानंतर नवरा तिच्यावर हलालासाठी दबाव टाकू लागला. नसीमाला आपला संसार मोडावा, अशी अजिबात इच्छा नव्हती. पण ती हलालासाठी तयार नव्हती. तिला हलाला प्रथेला विरोध केला, म्हणून नवरा आणि सासरकडच्यांनी तिला घराबाहेर काढले.
नसीमाची मीनाक्षी बनली
त्यानंतर नसीमा तिच्या माहेरी पूर्णियाला आली. आयुष्यात नैराश्य आलं होतं. वेळ घालवण्यासाठी म्हणून तिने सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यावेळी इन्स्टाग्रामवर तिची ओळख मनोज शर्मा नावाच्या युवका बरोबर झाली. मनोजने नसीमाला त्याच्याबद्दल सर्वकाही सांगितलं. दोघांमध्ये मैत्रीपासून सुरुवात झाली. पुढे प्रेम झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नसीमाने आपल्या कुटुंबीयांना समजावलं. ती मनोजच्या शहरात बरेलीमध्ये पोहोचली. नसीमाने तिचा मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. नसीमाची मीनाक्षी बनली. मग, बरेलीच्या अगस्त्य मुनि आश्रमात 15 फेब्रुवारीला दोघांनी लग्न केलं.