नवी दिल्ली: देशात आंदोलकांची एक टोळी सक्रीय झालाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. आंदोलक आणि आंदोलनावर टीका करून पंतप्रधान आंदोलकांचं खच्चीकरण करत आहेत. हे देशाच्या परंपरेला शोभणारं नाही, असं सांगतानाच रामजन्मभूमी, रथयात्रा हे आंदोलन नव्हतं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut slams narendra modi over andolan jivi statement)
संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला. आंदोलने होतच असतात. त्याचं खच्चीकरण करणं करणं देशाच्या परंपरेला शोभणारं नाही. भाजपही आंदोलन करूनच पुढे आला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करूनच भाजप पुढे आला आहे. भाजपच्या सायबर फौजांनी बदनामी आंदोलन उभारंल, त्यामुळे भाजपला चांगले दिवस आले, असं सांगतानाच राम जन्मभूमी आंदोलन, रथयात्रा, भारत जोडो, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम हे आंदोलन नव्हते काय? असा सवाल करतानाच तुम्हीच केलेल्या राष्ट्रीय आंदोलनाची तुम्हीच तुमच्या वक्तव्यातून बदनामी केली आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.
पवारांचा यूटर्न नाही
यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार यांची पाठराखण केली. शरद पवारांनी यूटर्न घेतलेला नाही. त्यांची भूमिका योग्यच आहे, असं राऊत म्हणाले. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून पंतप्रधानांनीच एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. शेतकरी अज्ञानी आहे. त्याच्या मनात भीती आहे. शेती, पीक हेच त्याचं जग आहे. त्यामुळे पंतप्रधांनी केवळ आवाहन करू नये. एक पाऊल पुढे यावं. शेतकऱ्यांशी बोलावं. त्याने पंतप्रधानांची ऊंची कमी होणार नाही, उलट त्यांची ऊंची वाढेल, असं त्यांनी सांगितलं.
आमचा बालही बाका होणार नाही
गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात येऊन बंद दाराआड शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचं सांगितलं होतं. डंके की चोटपर सांगतोय, असंही शहा म्हणाले होते. त्यावरही राऊतांनी निशाणा साधला. शहा डंके की चोटपर बोलत आहेत… बोलू द्या… शहा देशाचे गृहमंत्री आहेत… त्यांनी डंके की चोटवरच बोललं पाहिजे…. पण हा डंका कुणासाठी पिटला जातोय?… कुणाच्या व्यासपिठावरून पिटला जातोय… बरं… एवढं करून काय झालं?… आमचं काय वाकडं झालं?… धुरळा उडाला आणि बसला, अशी खोचक टीका त्यांनी केली. राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही. शहांनी नवा प्रयोग करावा. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून कारवाई करावी. आम्हाला तुरुंगात टाकावं, आम्ही त्यांचे शत्रू आहोत ना? पण आमचा बालही बाका होणार नाही, असंही ते म्हणाले. (sanjay raut slams narendra modi over andolan jivi statement)
VIDEO : राष्ट्रपतींचं भाषण हे आत्मनिर्भर भारताचं दर्शन घडवणारं : पंतप्रधान मोदी#PMRajyaSabha #PMModi @PMOIndia @narendramodi @BJP4India pic.twitter.com/Xc1Wio8RCb
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी
PM Modi Speech : मोदी है मौका लिजिए, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे