पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?…संजय राऊत औवेसीच्या पाठिशी

| Updated on: Jun 26, 2024 | 11:00 AM

Sanjay Raut: गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चाललली. परंतु आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?...संजय राऊत औवेसीच्या पाठिशी
संजय राऊत
Follow us on

लोकसभेत अध्यक्षपद सत्ताधारी तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाते. सदनात ही परंपरा राहिली आहे. आता तर विरोधी पक्ष मजबूत आहे. 240 पेक्षा जास्त खासदार विरोधी पक्षाकडे आहे. परंतु त्यानंतरही लोकसभेतील परंपरा सत्ताधारी पक्षाने मोडली आहे. त्यामुळे आता विरोधकांना एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाने लोकसभा अध्यक्षाची निवडणूक लादली आहे, असे शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ओवैसी यांचे संजय राऊत यांच्याकडून समर्थन

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी शपथविधी दरम्यान लोकसभेत जय पॅलेस्टाईन…अशी घोषणा दिली होती. त्याचे समर्थन संजय राऊत यांनी केले आहे. पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी ओवैसी यांचे समर्थन केले.

आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावे लागणार

गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चाललली. परंतु आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच अरविंद केजरीवाल प्रकरणात सरकारने दबाव तंत्राचा वापर करुन जामीन रद्द करुन घेतला, असा आरोप त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

आधीच्या लोकसभेत एकाच वेळी ७५-८० खासदारांना निलंबित करून लोकशहीचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्ला यांना त्या पदावर मोदी बसवत आहेत. प्रोटेम स्पीकर पदासाठी सर्वात ज्येष्ठ असलेल्या के सुरेश यांना डावलून कमी वेळा खासदार असलेल्या व्यक्तीला बसवले. त्यामुळे त्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.