अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच कंगना यांनी महाराष्ट्रा सदनातील सीएमची खोली मागितली होती. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत मोठं वक्तव्य करत कंगना यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कंगना रनौत इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवानातच ठेवयाला हवं. मोठ्या सूटमध्ये… एक नियम आहे नवीन खासदार जेव्हा दिल्लीत निवडून जातत, तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात, त्याच राज्याच्या सदनात राहण्याची व्यवस्था केली जाते.’
‘कायम स्वरुपी निवासस्थान मिळेपर्यंत व्यवस्था केली जाते. कालच मी आमच्या खासदारांची चौकशी केली. ते महाराष्ट्र सदनात आहेत. त्यांना सिंगल रुम मिळाली आहे. कंगना रानौवत नावाच्या श्रीमती आहेत, त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा हा विनोद आहे. त्या हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांना हिमाचल सदनमध्ये ठेवावं.’
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना त्यांचा सूट द्यावा. महाराष्ट्रातील अनेक सीनिअर खासदार आहेत. जायंट किलर आहेत. मग त्यांनाही द्या मुख्यमंत्र्यांचा सूट… अशा मागण्या करणं हा मूर्खपणा आहे. असू द्या. त्या पंतप्रधानांच्या निवासात ठेवा असं त्या म्हणू शकतात. त्या मोठ्या कलाकार आहेत.
इतर खासदारांप्रमाणेच त्याही खासदार आहेत. त्यांना स्पेशल सुविधा मिळणार नाही. महाराष्ट्रातून निवडून गेलेले महाराष्ट्र सदनात राहतात. गुजराजतचे गुजरात सदनात राहतात. कंगना या हिमाचलमधून आल्या आहेत. त्यांची व्यवस्था हिमाचल भवनात झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूट का द्यावा. पण कंगनाला कोण बोलणार? असं संजय राऊत म्हणाले आहेत.
कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाद कायम समोर येत असतात. शिवाय दोघे एकमेकांवर निशाणा साधताना देखील दिसतात. कंगना रनौत कायम वादाच्या भोवऱ्यात असतात. स्वतःची परखड भूमिका मांडत कंगना रनौत चर्चेत असतात.
खासदार कंगना रनौत
कंगना रनौत यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते.