Sawariya Seth Mandir: देशभरातील कृष्णभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सावलिया सेठ मंदिरात दानाचा नवीन विक्रम झाला आहे. राजस्थानमधील चितोडगढ जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात आलेल्या दानाची मोजणी करण्यात आली. त्यावेळी भगवतांच्या भंडारात भक्तांनी भरभरुन दान दिल्याचे स्पष्ट झाले. भंडारात 34 कोटी 91 लाख रुपये रोख आले. तसेच अडीच किलो सोने आणि 188 किलो चांदी भक्तांनी दिली. मंदिरातील या दानाचा आतापर्यंतचा विक्रम आहे. देशभरातून आलेले भक्त आपल्या श्रद्धेनुसार मंदिरात दान करत असतात.
सावलिया सेठ मंदिरात आलेल्या दानाची मोजणी मागील सहा दिवसांपासून सुरु होती. मागील दोन महिन्यांपूर्वी केलेल्या मोजणीत 17 कोटी रुपये सोने आले होते. सावरिया सेठ मंदिरात प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला दान पत्र उघडले जातात. परंतु यंदा दिवाळीमुळे दानपत्र उघडले गेले नव्हते. ते दोन महिन्यानंतर आता उघडले गेले.
सावलिया सेठ यांच्या दरबारात सोन्या-चांदीचेही मोठे दान मिळाले आहे. भगवंतांचा भंडारामध्ये 2 किलो 290 ग्रॅम सोने आणि 58 किलो 900 ग्रॅम चांदी दान म्हणून आले आहे. तसेच भेट कक्षामध्ये 504 ग्रॅम 560 मिलीग्रॅम सोने आणि 128 किलो 930 ग्रॅम चांदी आली आहे. म्हणजेच एकूण दोन महिन्यांत 2 किलो 794 ग्रॅम 560 ग्रॅम सोने आणि 187 किलो 9 ग्रॅम चांदी आली आहे. दान म्हणून 13 लाख 93 हजार नाणी मिळाली. मंदिरातील दानाची मोजणी 6 फेऱ्यांमध्ये (दिवस) पूर्ण झाली आहे.
सावलिया शेठ मंदिरात आजपर्यंतचा हा सर्वात मोठा दानाचा विक्रम आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाव्या टप्प्यातील मोजणी झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने येथे मिळालेल्या दानाची माहिती दिली. दानपेटीतून 25 कोटी 61 लाख 67 हजार 581 रुपयांची रोकड दान म्हणून मिळाली आहे. 30 लाख 27 हजार 427 रुपये ऑनलाइन माध्यमातून दान मिळाले आहे. भाविकांनी ऑनलाइन व मनीऑर्डरद्वारेही दान पाठवले. या पद्धतीने 9 कोटी 30 लाख 27 हजार 427 रुपये कार्यालयात जमा झाले आहेत. त्यानंतर एकूण 34 कोटी 91 लाख 95 हजार 68 रुपये मिळाले.