Sdm Jyoti Maurya | ‘तुला पायाची चप्पल बनवून….’, पण ज्योती मौर्य बनू देणार नाही, ही असली कसली नवरेशाही?

| Updated on: Jul 09, 2023 | 12:01 PM

Sdm Jyoti Maurya | बहुचर्चित Sdm महिला अधिकारी ज्योती मौर्यच प्रकरण समोर आल्यानंतर समाजात असे प्रकार वाढू लागले आहेत. पीडित महिलेसमोर कोणताही पर्याय राहिला नाही, म्हणून तिने अखेर राज्य मंत्र्याच्या जनता दरबारात धाव घेतली.

Sdm Jyoti Maurya | तुला पायाची चप्पल बनवून...., पण ज्योती मौर्य बनू देणार नाही, ही असली कसली नवरेशाही?
kannauj husband refused to let his wife study further
Image Credit source: tv9
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बहुचर्चित महिला अधिकारी ज्योती मौर्य प्रकरणाची धग आता कन्नौजपर्यंत पोहोचली आहे. इथे एका नवऱ्याने बायकोला शिकवायला नकार दिला आहे. या पतीने आपल्या पत्नीचा मोबाइल फोनही हिसकावून घेतला. जेणेकरुन तिला मोबाइलवरुन कुठला मेसेज येणार नाही. तिला B.Ed परीक्षेचा पेपर देता येऊ नये, ही त्यामागे भूमिका होती. नवऱ्याकडून आता जास्त छळ होतोय, असं पीडित महिलेने सांगितलं.

एसडीएम ज्योती मौर्यच प्रकरण समोर आल्यापासून आपला नवरा असाच वागतोय, अंसं पीडित महिलेने सांगितलं. तुला दुसरी ज्योती मौर्य बनू देणार नाही, पायाची चप्पल बनवून ठेवेन असं नवरा आपल्याला म्हणतो, असं पीडितेने सांगितलं. पत्नीने समाज कल्याण मंत्री असीम अरुण यांच्या जनता दरबारमध्ये पोहोचून न्यायाची मागणी केली.

तिला परीक्षा द्यायची होती

कन्नोज जिल्ह्यातील कोतवाली दलेलपुरवा भागात महिला राहते. पीडित दीक्षाच लग्न 3 महिन्यापूर्वी विजय सिंह सोबत झालं होतं. दीक्षा बीएड परीक्षेची तयारी करत होती. लग्नानंतर दीक्षाने तिच्या पतीला बीएड परीक्षेसंबंधी सांगितलं, तेव्हा तो भडकला. पीडित दीक्षाने सांगितलं की, विजयने आधी तिचा मोबाइल हिसकावून घेतला. नंतर म्हणाला की, तुला पायाची चप्पल बनवून ठेवेन, पण दुसरी ज्योती मौर्य बनू देणार नाही.

उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला

पीडितेने रडत-रडतच राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार असीम अरुण यांना या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हे ऐकल्यानंतर धक्का बसला. पीडित दीक्षाच म्हणणं आहे की, तिला शिकायचय पण नवरा शिकू देत नाहीय.

ज्योती मौर्य प्रकरणापासून टार्गेट केलं जातय

असीम अरुण यांनी महिलेच म्हणण ऐकून घेतलं व तिला न्याय मिळवून देण्याच आश्वासन दिलय. असे प्रकार रोखण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. सासरी महिलांना शिक्षणापासून रोखण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. ज्योती मौर्य प्रकरणापासून सोशल मीडियावर सुद्धा महिलांना टार्गेट केलं जातय.