खळबळजनक ! केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला, हल्लेखोर बेभानपणे गाड्या फोडत सुटला; मंत्री थोडक्यात बचावले

| Updated on: Apr 09, 2023 | 8:27 AM

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या ताफ्यावर एका व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन वाहनांच्या काचा फुटल्या. तसेच एकजण जखमी झाला आहे. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून तो मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे.

खळबळजनक ! केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला, हल्लेखोर बेभानपणे गाड्या फोडत सुटला; मंत्री थोडक्यात बचावले
Nityanand Rai
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पटना : केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. बिहारच्या पूर्व चंपारण येथून पटण्याला जात असताना त्यांच्या ताफ्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. नित्यानंद राय यांचा ताफा येताच या व्यक्तीने हातात काठी घेऊन वाहनांची तोडफोड सुरू केली. बेभान होऊन ही व्यक्ती गाड्या फोडत सुटला होता. या व्यक्तीच्या हल्ल्यात दोन वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच हल्लेखोराला प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावलेला राय यांच्या ताफ्यातील एक व्यक्ती जखमी झाला आहे. या हल्ल्यात नित्यानंद राय थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही हानी झाली नाही. पोलिसांनी हल्लेखोर अमित साह याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली जात आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या ताफ्यावर हल्ला करणारा अमित साह हा मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी नित्यानंद राय हे पूर्व चंपारणमधील सरोतर येथे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पटनाकडे जायला निघाले होते. त्यांचा ताफा साहेबगंजच्या पुढे गेला. विशुनपूर सरैया चौकात ताफा येताच हल्लोखोर अमित साहने त्यांच्या ताफ्यावर लाठीने हल्ला करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

मंत्री महोदय बचावले

सुदैवाने हा हल्ला झाला तेव्हा नित्यानंद राय यांची गाडी पुढे निघून गेली होती. मागे येणाऱ्या दोन गाड्यावर साहने हल्ला चढवला. साहने अचानक गाड्यांवर काठीने प्रहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्लेखोराला आवर घालण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोर थांबला नाही. हल्लेखोराच्या या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतरही ताफा थांबला नाही. नित्यानंद राय सुखरूप पटना येथे पोहोचले. मात्र, थेट केंद्रीय मंत्र्याच्या आणि तेही गृहराज्य मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने पोलिसांच्या चांगलेच तोंडचे पाणी पळाले आहे.

तक्रार नाही

पोलिसांनी अमित साह याला अटक करून त्याची कसून चौकशी केली. आजूबाजूला साह याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो मनोरुग्ण असल्याचं समजलं. देवरीयाचे पोलीस अधिकारी उदय कुमार सिंह यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्याची कोणतीही लिखित तक्रार मिळाली नाही. परंतु, पोलीस आपल्या स्तरावर तपास करत आहे, असं उदय कुमार सिंह यांनी सांगितलं.