नवी दिल्ली : पाकिस्तानातून अधिकृत वीजाशिवाय भारतात आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात डिपोर्ट केलं जाऊ शकतं. यूपीचे विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी हे संकेत दिले आहेत. या संबंधी त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. सीमाला निर्वासित केलं जाऊ शकत का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी “यासंबंधी कायदा आहे आणि याचं पालन केलं जाईल. कायदेशीर आदेशानुसार कारवाई सुरु आहे” असं उत्तर दिलं.
पुरेसे पुरावे हातात नाहीत, तोवर सीमा हैदर पाकिस्तानी हेर आहे असं म्हणता येणार नाही. 30 वर्षाची सीमा आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना (22) यांची दोन दिवस यूपी एटीएसने चौकशी केली.
पबजी खेळताना सूर जुळले
4 जुलैला ग्रेटर नोएडा पोलिसांनी सीमाला अटक केली होती. 7 जुलैला न्यायालयाने तिला जामीन दिला. सीमाने नेपाळमार्गे ती भारतात आल्याच सांगितलं. पबजी खेळताना सचिन आणि सीमाची ओळख झाली. त्यांच्या प्रेमसंबंध विकसित झाले. न्यूज चॅनलपासून सोशल मीडियापर्यंत सीमा बद्दल बरच काही बोललं जातय.
सीमाला डिपोर्ट कधी करणार?
लखनऊ डीजीपी मुख्यालयातील सिनियर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, केंद्रीय यंत्रणांना सीमाच्या डिपोर्ट्बद्दल निर्णय घ्यायचा आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या सीमा बद्दल अंदाज बांधले जातायत. ती आयएसआय एजंट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काही एक्सपर्टनुसार, ती पाकिस्तानच्या स्लीपर सेलचा भाग असू शकते. सीमाला डिपोर्ट कधी करणार? आपल्या देशाचा कायदा काय सांगतो? याची चर्चा आहे.
सीमाला परदेशात पाठवण्याची प्रक्रिया काय असेल?
आपल्या देशात बेकायदरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना डिपोर्ट् करण्याचा निर्णय इमिग्रेशन विभागाच्या माध्यमातून गृह मंत्रालय घेते. त्याची एक प्रक्रिया आहे. बेकायदरित्या राहणाऱ्या नागरिकांना अटक केली जाते. त्यानंतर त्यांच्याविरोधात केस चालवण्याऐवजी त्यांना डिपोर्ट केलं जातं. अटकेनतंर अशा लोकांना FRRO मध्ये हजर केलं जातं. तिथून त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवलं जातं. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी 15 ते 60 दिवस लागतात. वेगवेगळ्या शहरात अशी ऑफिसेस आणि डिटेंशन सेंटर बनलेले आहेत.