नवी दिल्ली : नवऱ्याला सोडून 4 मुलांसह पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा खोटेपणा उघड झाला आहे. सध्या सोशल मीडियावर सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची चर्चा आहे. सीमाच भारतात राहणाऱ्या सचिन बरोबर सूत जुळलं. प्रेमासाठी आपण पाकिस्तान सोडून भारतात आलो, असं सीमा हैदरच म्हणण आहे. या संदर्भात रोज काही ना काही नवीन माहिती समोर येत आहे. आता TV9 भारतवर्षने मोठा खुलासा केला आहे.
TV9 भारतवर्षकडे सीमा हैदरच्या निकाहच प्रतिज्ञापत्र आहे. यात सीमाने पाकिस्तानी नागरिक गुलाम हैदरसोबत प्रेम विवाह केल्याच म्हटलं आहे. सीमचा नवरा सौदी अरेबियात असतो. त्याने TV9 भारतवर्षशी बोलताना याला दुजोरा दिला होता.
कुठल्या कागदपत्रातून खोटेपणा उघड ?
सीमाने सुरुवातीपासून लव्ह मॅरेज झाल्याच नाकारल होतं. माझं लग्न दबावाखाली झालं, हे लव्ह मॅरेज नाही, असं तिचं म्हणणं होतं. पण आता TV9 भारतवर्षकडे एफिडेविट आहे. त्यातून सीमा खोटं बोलत असल्याच स्पष्ट होतय.
पाकिस्तानचा हेरगिरीचा नवीन पॅटर्न ?
लग्नाच्या 10 दिवस आधी सीमाने तिचं घर सोडलं होतं, असं या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे. एफिडेविटमध्ये सीमानेच लिहिलय की, तिने तिच्या पसंतीने निकाहचा निर्णय घेतला होता. सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा आहे. हे सर्व तिने प्रेमासाठी केलं असं काहीजणांच म्हणणं आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा हेरगिरीचा हा नवीन पॅटर्न असल्याच काही जणांच मत आहे.
एफिडेविटमध्ये काय म्हटलय?
सीमा हैदरच खोटं सातत्याने पकडलं जातय, त्यामुळे तिच्यावरचा संशय वाढत चालला आहे. एफिडेविटमध्ये लिहिलय की, “तिने तिच्या पसंतीने लग्न केलं. आपलं घर सोडलं. कुठलीही भिती किंवा दबावाशिवाय हे पाऊल उचललं” हे एफिडेविट 2014 च असून तिने त्यात वडिलांना स्वार्थी म्हटलं आहे.
निकाहच्यावेळी वय काय होतं?
वडिलांना ज्या मुलाशी लग्न लावून द्यायचं आहे, तो भटकणारा आणि लोफर असल्याच तिने एफिडेविटमध्ये म्हटलं होतं. सीमा तिच्या वयाबद्दलही खोट बोलत असल्याच निष्पन्न झालय. सीमाने तिच्या ओळखपत्रावर जन्मतिथी 2002 असल्याच दाखवलं आहे. पण प्रतिज्ञापत्रावर जन्मतारीख वेगळीच आहे. सीमाकडे याबद्दल चौकशी केली, तेव्हा तिने लग्नाच्यावेळी तिचं वय 16-17 असल्याच सांगितलं.
प्रियकरासोबत कुठे राहत होती?
सीमा नेपाळमार्गे भारतात आली. ग्रेटर नोएडामध्ये ती प्रियकर सचिनसोबत राहत होती. भारतात तिला सुरक्षित वाटतं. आपल्याला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं जाईल, ही भिती तिच्या मनात आहे. सीमाला कोणी फसवून भारतात आणलेलं नाही. ती तिच्या मर्जीने प्रेमासाठी स्वत:हून इथे आली आहे.
सीमा हैदरला किती मुलं?
सीमा हैदरला 4 जुलैला बेकायदरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. यावेळी तिची मुलं सोबत होती. सचिनला बेकायदरित्या शरण दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दोघे आता जामिनावर बाहेर आहेत. सीमा हैदरला 4 मुलं आहेत.
दोघांनी कुठल्या देशात लग्न केलं?
सीमा हैदर आणि सचिनची पहिली भेट नेपाळ काठमांडूमध्ये झाली होती. तिथे त्यांनी गुपचूप लग्न केलं. त्यानंतर ती पाकिस्तानात निघून गेली. तिने तिथे एक प्लॉट विकला. स्वत:साठी व मुलांच्या विमान तिकीटांसाठी पैशांची व्यवस्था केली.