नवी दिल्ली : दीवानगी में हम कुछ ऐसा कर जाएंगे, मोहब्बत में सारी हदें पार कर जाएंगे…. पाकिस्तानातून लपून-छपून भारतात आलेल्या सीमा हैदरला या ओळी तंतोतंत लागू पडतात. सचिन मीणा हा सीमाच प्रियकर भारतीय आहे. त्याला भेटण्यासाठी सीमाने फक्त घराचा उंबरठा ओलांडला नाही, तर देशाच्या सीमा ओलांडून ती भारतात आली. सीमा हैदर भारतात दाखल झाल्यापासून ती टीव्ही प्राइम टाइमचा भाग बनलीय.
सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय, तर काही जण त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. सीमा हैदरच्या पासपोर्टपासून तिच्या शिक्षणापर्यत अनेक प्रश्न विचारले जातायत. सीमा हैदरच्या 5 खोट्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमकथेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.
1- सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात दाखल झाली, त्यावर पाकिस्तानी यूट्यूबर शोएब मलिकने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. सीमा पाकिस्तानी एजंट असू शकते, तिला कुठल्यातरी स्पेशल मिशनसाठी पाठवलेले असू शकतं, असं शोएब मलिकच म्हणणं आहे. काही लोकांनी यूट्यूबरचा मुद्दा खोडून काढला. पाकिस्तानात महिलांच्या स्थितीबद्दल त्याला उलटे प्रश्न विचारले.
2 सीमा हैदर म्हणते ती 5 वी पास आहे. पण तिची इंग्रजी भाषेवर उत्तम पकड आहे. पबजी खेळताना नोएडाच्या सचिन बरोबर बोलणं सुरु झालं, असं सीमाने सांगितलं. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, त्यानंतर ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. स्वत:चा वीजा सीमाने स्वत:च बनवलाय, या प्रक्रियेतून जाणं सीमासाठी अजिबात सोपं नव्हतं. त्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण होतायत.
3 सीमा हैदर भले 5 वी शिकली असेल, पण कॉम्प्युटर आणि मोबाइल चालवण्यात ती एक्सपर्ट आहे. पबजी खेळण्यात माहीर असलेल्या सीमाला मोबाइलवरुनच सचिनवर प्रेम जडलं. सचिन आणि सीमा दोघे दररोज दोन ते तीन तास पबजीवरुन चॅटिंग करायचे. भारतात आल्यानंतर ती दुसऱ्या हॉट स्पॉटवरुन सचिनशी बोलली.