प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरला ATS ने घेतले ताब्यात, या गोष्टींमुळे गुप्तहेर असल्याचा संशय

| Updated on: Jul 17, 2023 | 6:00 PM

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर हिला यूपी एटीएसने ताब्यात घेतले आहे. ती भारतात कशासाठी आली याची चौकशी केली जात आहे. ती गुप्तहेर असल्याचा संशय आहे.

प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरला ATS ने घेतले ताब्यात, या गोष्टींमुळे गुप्तहेर असल्याचा संशय
Follow us on

नवी दिल्ली : आपल्या ४ मुलांसह पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर प्रकरणात ( Seema Haider) आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रेमाच्या बहाण्याने भारतात आलेला सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर ( Pakistani Spy ) असल्याचा संशय आहे. इंटेलिजन्स ब्युरोने (IB) दिलेल्या अहवालाच्या आधारे यूपी एटीएसने सीमाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता तिची चौकशी सुरू आहे. सीमा हैदरशिवाय सचिन मीना आणि त्याचे वडील नेत्रपाल यांनाही एटीएसने ( ATS ) ताब्यात घेतले आहे.

पोलीस आणि एटीएसचं पथकाने आज सीमा हैदर ताब्यात घेतले.ती आयएसआयचे एजंट ( ISI Agent ) असल्याचा संशय आहे. गुप्तचर यंत्रणांनी सीमा हैदरबाबत बरीच माहिती गोळा केलीये. सीमा हैदर प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

सीमाचे कुटुंबिय पाकिस्तानी सैन्यात

सीमा हैदरचा भाऊ हा पाकिस्तानी सैन्यात आहे. तिचे काकाही सुभेदार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे सीमा ही भारतात कशासाठी आले. तिचा खरा उद्देश काय आहे. याची माहिती आता चौकशीदरम्यान घेतली जात आहे. तिला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सीमा ही आयएसआयची एजंट आहे का याची ही शोध घेतला जात आहे. सीमा हैदर ही गेल्या अनेक दिवसांपासून सचिनच्या कुटुंबासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. मे महिन्यात नेपाळमार्गे ती भारतात आली होती. अशी माहिती तिने मीडियाला दिली होती. PUBG खेळत असताना सचिनवर प्रेम जडलं आणि त्यामुळे मी भारतात आल्याचे तिने म्हटले होते.

सीमा हैदर कशी आली रडारवर

एटीएसने सीमा हैदरबाबतही आधीच बरीच माहिती गोळा केलीये. सीमा हैदर ही गुप्तहेर म्हणूनच भारतात आल्याचा संशय आहे. तिचे व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुराव्यांच्या आधारे सीमाची आता चौकशी केली जात आहे. सीमा हैदरकडे असलेले कागदपत्र उच्चायुक्तांकडे पाठवण्यात आले आहे.

सीमा हैदरवर आधीच शंका व्यक्त केली जात आहे. फक्त पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेली सीमा ज्या प्रकारे मोबाईल आणि कॉम्प्युटर वापरते त्यावरुन तिच्यावर संशय आला. पबजी खेळत असताना प्रेम होणे, त्यानंतर तीन देशांच्या सीमा ओलांडून येणे हे संशयास्पद असल्याचं देखील म्हटलं जात होतं.