पंजाब काँग्रेसला झटका, कॅप्टन अमरिंदर सिंह अमित शाहांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता, केंद्रातलं मंत्रिपदही ठरल्याची सुत्रांची माहिती

| Updated on: Sep 29, 2021 | 7:00 PM

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमरिंदर सिंह अमित शाहांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले.

पंजाब काँग्रेसला झटका, कॅप्टन अमरिंदर सिंह अमित शाहांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता, केंद्रातलं मंत्रिपदही ठरल्याची सुत्रांची माहिती
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Follow us on

नवी दिल्ली: पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबद्दल जी शक्यता वर्तवली जात होती, ती खरी झाली आहे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमरिंदर सिंह अमित शाहांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले. दरम्यान, काल अमरिंदर सिंह यांनी कुठल्याही राजकीय भेटीची शक्यता नाकारली होती, मात्र अखेर अमरिंदर सिंह अमित शाहांच्या भेटीला पोहचलेच. अमित शाह भेटीनंतर आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरु झाली आहे. ( Senior Punjab Congress leader and former Punjab Chief Minister Amarinder Singh and Home Minister Amit Shah meet in Delhi, Amarinder Singh likely to join BJP )

अमरिंदर सिंह हे भाजप प्रवेश करणार?

दरम्यान, पंजाबच्या राजकारणात ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे. राजकीय सुत्रांच्या मते, अमरिंदर सिंह भाजपचं कमळ हाती घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यासाठीच त्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो. पुढच्या वर्षी होणारा पंजाब विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य ठेऊन भाजप आता आपली चाल चलत आहे. एकीकडे दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत, ज्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे, जे शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहेत, त्यामुळे या मतदारांची नाराजी दूर करण्याचाही भाजप प्रयत्न करु शकतो. यासाठीच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर त्यांना केंद्रात कृषिमंत्रीपद दिलं जाऊ शकतं.

 

 

आधी काय म्हणाले होते अमरिंदर सिंह

दरम्यान, काल पत्रकारांशी बोलताना अमरिंदर सिंह यांनी कुठल्याही राजकीय भेटीची शक्यता नाकारली होती. ते म्हणाले होते की, ‘मी घरी जाणार आहे, सगळं सामान गोळा करुन नंतर पंजाबला जाईल.’ हेच नाही ते हेही म्हणाले होती की,’ इथं मी कुठल्याही राजकीय नेत्याची भेट घेणार नाही, कुठल्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम होणार नाही. मी कपूरथला हाऊस जे मुख्यमंत्र्यांचं घर आहे, ते खाली करण्यासाठी आलो आहे’

सिद्धूच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रीया

दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतरही अमरिंदर सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ‘मी आधीच सांगितलं होतं की, तो माणूस स्थिर नाही, पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यासाठी हा माणूस फीट बसत नाही’

हेही वाचा:

राजीनामा मागं घेण्यासाठी सिद्धूंच्या 3 अटी, हायकमांडची कडक भूमिका कायम, पंजाबमध्ये आता पुढं काय होणार?

उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले