कुणाच्या घोर चुकीची शिक्षा तिला मिळाली, 94 टक्के मिळूनही ‘ती’ नापास झाली

| Updated on: Apr 26, 2023 | 6:43 PM

अमेठी शहरातील श्री शिव प्रताप इंटर कॉलेजची विद्यार्थिनी भावना वर्मा हिला 94 टक्के गुण मिळाले. पण, प्रमाणपत्रावर ती नापास असल्याचे लिहिले होते. हा निकाल पाहून भावना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली.

कुणाच्या घोर चुकीची शिक्षा तिला मिळाली, 94 टक्के मिळूनही ती नापास झाली
STUDENT BHAVNA
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

अमेठी : उत्तर प्रदेश बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मात्र, या निकालामुळे एका बातमीची जोरदार चर्चा देशात सुरु आहे. 94 टक्के गुण मिळालेल्या एका हुशार विद्यार्थिनीला बोर्डाने नापास घोषित केले आहे. विद्यार्थिनीला सर्वच विषयात चांगले गुण मिळाले असताना ती नापास कशी झाली हा एकच प्रश्न चर्चिला जात आहे. त्या विद्यार्थिनीने आपले पेपर पुन्हा तपासण्याची मागणी केली असून याबाबत तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे.

अमेठी शहरातील श्री शिव प्रताप इंटर कॉलेजची विद्यार्थिनी भावना वर्मा हिला 94 टक्के गुण मिळाले. पण, प्रमाणपत्रावर ती नापास असल्याचे लिहिले होते. हा निकाल पाहून भावना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. भावनाने आणि तिच्या कुटुंबाने थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे. आपणच आता चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी तिने या पत्रातून केली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय झालं ?

भावना वर्मा हिला लेखी परीक्षेत 402 गुण मिळाले. तर, प्रॅक्टिकलमध्ये 30 ऐवजी 3 गुण देण्यात आले. त्यामुळे 180 ऐवजी केवळ 18 गुण जोडले गेल्याने ती नापास झाली. प्रॅक्टिकलचे तिचे 180 गुण जोडले असते तर तिचे एकूण गुण 564 म्हणजे 94 टक्के झाले असते.

चूक कुणाची ?

शाळेचे मुख्याध्यापक नवल किशोर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यालयाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. भावना हिचे सर्वच विषयात गुण चांगले आले आहेत. पण, प्रॅक्टिकलच्या गुणांची त्यात भर पडली नाही. त्यामुले नापास असा निकाल आला. या निकालात दुरुस्ती करून तिला नवीन निकाल दिला जाणार आहे.

माध्यमिक शिक्षण संचालक महेंद्र देव यांनी टायपिंगमधील त्रुटीमुळे हा प्रकार घडला असावा. निकालाची दुरुस्ती करून तिच्या प्रात्यक्षिक गुणांच्या आधारे पुन्हा निकाल तयार केला जाईल, असे सांगितले.

भावनाचे थेट मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

भावना आणि तिच्या कटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी याना पत्र लिहिले आहे. माझे थेअरी आणि प्रात्यक्षिक दोन्ही पेपर चांगले गेले. परंतु, माझ्या निकालात व्यावहारिक गुण जोडले गेले नाहीत. आम्हाला 30 नंबर मिळाले पण निकालात फक्त 3 नंबर जोडले गेले. त्यामुळे गुणांची संख्या वाढविण्यात यावी आणि याची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.