चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; संजय राऊतांनाच खोचक टोला

| Updated on: Jan 14, 2022 | 10:11 AM

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल.

चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; संजय राऊतांनाच खोचक टोला
sanjay raut
Follow us on

नवी दिल्ली: चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी त्यांनी गोव्याच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझं आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीका त्यांनी केली. उद्या तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांशी भेट होणार असून त्यात गोव्याच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपच्या आयुष्यात टीकेशिवाय काय आहे?

भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहे. यावर भाजपनं बोलावं सीमेवर गंभीर परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. तसेच कालच्या पंतप्रधानांच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून टिकेत यांना भेटलो

राकेश टिकेत लढाई संपवून घरी गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी त्यांना भेटलो, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या भेटीतील चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.

उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरही भाष्य केलं. उत्तर प्रदेशात आम्ही 50 जागा लढणार आहोत, असं सांगत राऊत यांनी स्वबळाचा नाारा दिला.

ही भाषा दक्षिणेत जाऊन करा

एमएमआयचे नेते इम्तियाज जलील यांननी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खर्च द्यायचा की नाही ते आम्ही पाहू. तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्राच्या मातीचे खाता, मराठी मातीचा श्वास घेता, पण ही वक्तव्य म्हणजे याला बेइमानी म्हणतात. शिवसेनेचा जन्म हा मराठी अस्मितेच्या प्रश्नावर झालाय, ही भाषा दक्षिणेत जाऊन करा. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

VIDEO | बस ड्रायव्हरला फीट, प्रवासी महिलेने स्टेअरिंग सांभाळलं, पुण्यातील रणरागिणीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Nashik Corona: वरनभातलोन्चा नि नियम खरा कोन्चा; कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा नाशिकमध्ये खेळखंडोबा