नवी दिल्ली : एक धक्कादयाक प्रकार समोर आला आहे. बीजेपीचे अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचं ट्विटर अकाउंट हॅक (Twitter Account Hacked) करण्यात आले आहे. ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर या खात्यावरून रशिया (Russia) युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. आज सकाळी त्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकरने युक्रेनला मदत करण्याचे आवाहन जेपी नड्डा यांच्या अकाउंटवरून केले. या ट्विटमध्ये हॅकरने म्हटले की, ”सॉरी माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. सध्या युक्रेनला मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही युक्रेनच्या मदतीसाठी पुढे या” दरम्यान त्यानंतर या हॅकरने त्यांच्या ट्विटर अकाउंटचे नाव देखील बदलले होते. त्यानंतर काही वेळाच त्यांचे खाते पूर्ववत करण्यात आले असून, नड्डा यांचे खाते नेमके कोणी हॅक केले? ते कुठून हॅक झाले यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ट्विटर इंडियाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीजेपीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अकाउंटवरून यापूर्वी देखील मुंबई आणि दिल्लीमधून दोनदा लॉगइन करण्यात आले आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे ट्विटर इंडियाने म्हटले आहे. आता संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जेपी नड्डा यांनी आपल्या अकाउंटवरून आज सकाळी शेवटचे ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी उत्तरप्रदेशमधील लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. या ट्विटनंतर लगेचच त्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले. त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये उत्तरप्रदेशमधील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आज उत्तप्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. लोकांना मी विनंती करतो की त्यांनी मतदान करावे असे नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे, रशियाने युद्ध थांबवून सैन्य माघारी बोलावे असा प्रस्थाव संयुक्त राष्ट संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आला होता. यावेळी युक्रेनच्या बाजूनं संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य असलेल्या आकरा देशांनी मतदान केले. मात्र भारतासह चीन आणि युएईने मतदान करणे टाळले. भारताकडून युद्धाचा निषेध करत अलिप्त राहण्याची भूमिका घेण्यात आली.
जेपी नड्डांचे ट्विटर अकाउंट हॅक
अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!
काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी
VIDEO: महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहेत काय?; संजय राऊतांचा भाजपला सवाल