नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. या संशयित दहशतवाद्यांना महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलंय. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे ओसामा आणि जिशान अशी आहेत. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे. (six suspects including two pakistani terrorists arrested who planned to blast in different places of country)
मिळेलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस स्पेशल सेल तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.
दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये माहाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघांना दिली तेसच तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलंय. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणं होती.
इतर बातम्या :
लोजपा खासदार रेप केसमध्ये ट्विस्ट, शरीर संबंध ठेवल्याची कबूली, 2 लाख रुपयेही दिले
Gujrat Flood Update : गुजरातमध्ये महापूर, जामनगर, राजकोट जिल्हे पाण्याखाली, NDRFकडून बचावकार्य सुरु
(six suspects including two pakistani terrorists arrested who planned to blast in different places of country)
केंद्र सरकार या योजनेअंतर्गत मुलींना देतेय एक लाख 60 हजार रुपये रोख, जाणून घ्या काय आहे सत्य?https://t.co/f8J9fuu7Yv#CentralGovernment |#Scheme |#Girls |#Money
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2021