रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. काही देश युक्रेनच्या मदतीसाठी समोर आलेत. जर्मनी (Germany) च्या सरकारनं शनिवार सांगितले की, युक्रेनला टँकविरोधी शस्त्र पाठविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. रशियाच्या स्विफ्ट बँकिंग प्रणालीवर काही निर्बंधांचे समर्थन करण्यात आले आहे. जर्मनीच्या आर्थिक आणि जलवायू मंत्रालयातने शनिवारी सांगितले की, नेदरलँडला जर्मनीत तयार झालेले 400 टँकविरोधी शस्त्र युक्रेनला पाठविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला ही खूप मोठी बाब आहे. सध्य स्थितीत आम्ही ब्लादिमीर पुतीन यांच्या आक्रमक सेनेशी लढण्यासाठी युक्रेनची मदत करणार आहोत, असं जर्मन चांसलर ओलाफ शॉल्त्स यांनी स्पष्ट केलंय.
एएफपी न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, जर्मनी युक्रेनला 1,000 टँकविरोधी शस्त्र, 500 हवेतून मारा करणारे मिसाईल पाठवणार आहेत. फ्रान्स युक्रेनला सैन्यांसाठी आवश्यक उपकरणे देणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी सैन्य सहायतेसाठी 350 मिलीयन डॉलर देण्याची घोषणा केली. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकन यांना बायडेन यांनी निर्देश दिले की, विदेशी सहायता अधिनियमाअंतर्गत मदत दिली जावी. मदत युक्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिली जाईल. अमेरिकेकडून ही मदत युक्रेन संकटात सापडल्यानंतर येत आहे.
नेरदलँड युक्रेनला दोनशे हवाई रॅकेट देणार आहे. अमेरिका पस्तीस कोटी डॉलरची हत्त्यारे पुरविणार आहे. चेक रिपब्लिकन हा देश 85 लाख डॉलरची हत्यारे, दारुगोळा पुरविणार आहे. स्लोवाकिया सेन्यासाठी 26 लाख युरोप
ही एकप्रकारे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.