Chandrayaan-3 : चांद्रयान-3 ची प्रतिक्षा गेल्या १ वर्षापासून भारतीय करत होते. चांद्रयान २ मिशनदरम्यान लँडींगमध्ये अपयशी ठरल्यानंतर लगेचच मिशन तीनची सुरुवात करण्यात आली. पण यंदा मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांनी करुन दाखवलं. चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार याबाबत भारतीयांसह संपूर्ण जगातील खगोलप्रेमींमध्ये उत्साह दिसत होता. चंद्रयान ३ लँड होताच अनेकांची जल्लोष केला. याच दिवशी एका घरात आनंदाची गोष्ट घडली. एका जोडप्याने बुधवारी जन्मलेल्या आपल्या मुलाचे नाव विक्रम असे ठेवले आहे. गौरव शर्मा आणि श्वेता शर्मा यांनी विक्रम लँडरच्या नावावरुन आपल्या बाळाचे नाव विक्रम ठेवण्याचे ठरवले. बाळाचा जन्म सकाळी 7:12 वाजता झाला होता.
चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आणि देशवासियांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधान मोदींसह संपूर्ण जगाने इस्रोचं अभिनंदन केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. आनंदोत्सव साजरा केला गेला. ढोल-ताशांच्या गजरात अनेकांनी ठेका धरला. भारताने आपलं नाव इतिहासात नोंदवले.
मेरठमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव विक्रम ठेवले. मुलाच्या जन्माचा उत्साह तर होताच पण चांद्रयान ३ यशस्वीपणे उतरले याचा आनंदही या कुटुंबात होता. 23 ऑगस्टच्या सकाळी वर्मा कुटुंबात मुलाचा जन्म झाला. या मुलाचे नाव विक्रम ठेवण्यात आले. चांद्रयानच्या लँडरचे नाव विक्रम आहे. मुलगा झाला तर त्याचे नाव विक्रम लँडर ठेवण्याची तयारी या कुटुंबाने आधीच केली होती.
मुलाचे वडील गौरव वर्मा म्हणाले की, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्याने ज्याप्रमाणे जगात देशाचे नाव आहे, त्याचप्रमाणे माझा मुलगा विक्रम मोठा होऊन देशाचे नाव उंचावेल, या इच्छेने त्याचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे.