नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi News) यांच्यापाठोपाठ त्यांची मुलगी प्रियंका गांधी वाड्रा यांनाही कोरोनाची लागण झालीय. त्यांनी स्वतः ट्वीट करत याबाबतीच माहिती दिली. गुरुवारी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील अनेक काँग्रेस नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग (Corona Update News) झाला असल्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच आता प्रियंका गांधी वॉड्रा (Priyanka Gandhi Wadra) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. प्रियंका गांधी यांना कोरोनाची हलकी लक्षणं जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी चाचणी केली. पॉझिटिव्ह आल्याचं समजताच त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलंय. मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करत घरीच त्यांनी उपचार घेण्यास प्रियंका यांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलंय.
I’ve tested positive for COVID-19 with mild symptoms. Following all the protocols, I have quarantined myself at home.
हे सुद्धा वाचाI would request those who came in contact with me to take all necessary precautions.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 3, 2022
गुरुवारी सोनिया यांधी यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यानंतर, त्यांनीही कोरोनाची चाचणी केली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोनिया गांधींना तापाची हलकी लक्षणं दिसून आली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या संपर्कात आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आईला लागण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलंय.
दरम्यान, सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवलंय. कोरोनाची लागण झाली असली, तरी या चौकशीला सामोरं जाणार असल्याचं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय. 8 जूनला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश सोनिया गांधी यांना ईडीने नोटीसीसून दिले होते. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनाही ईडीनं नोटीस पाठवली होती. बुधवारी पाठवण्यात आलेल्या नोटिशीनंतर आता 48 तासांच्या आत पुन्हा एकदा राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत 4 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर देशात पडली आहे. दिवसभरात 4 हजार 41 नव्या रुग्णांची भर पडली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत 2 हजार 363 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 21 हजार 177 सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशभरातील 193 कोटी 83 लाख 72 हजार 365 जणांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.
#COVID19 | India reports 4,041 fresh cases, 2,363 recoveries, and 10 deaths in the last 24 hours.
Total active cases are 21,177. pic.twitter.com/XNfnLxQrbd
— ANI (@ANI) June 3, 2022
देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशाचा रिकव्हरी रेट हा 98.74 टक्के इतके असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशासर राज्यातही हळूहळू रुग्णवाढी चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच टास्क फोर्ससोबत बैठक घेत लोकांना नियम पाळण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलंय. अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असाही इशारा देण्यात आलाय.