नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी फेसबुक (facebook) आणि ट्विटरच्या (twitter) गैरवापरावरून आज सत्ताधाऱ्यांचं संसदेत लक्ष वेधलं. फेसबुकची सत्ताधाऱ्यांशी असलेलं साटेलोटं जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी धोका असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. फेसबुकने सत्तेशी साटेलोटं केलं आहे. त्यामुळे सामाजिक सौहार्द भंग पावत आहे. आपल्या लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे. फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल माध्यमांचा काही राजकीय नेते आणि राजकीय पक्षांद्वारे पॉलिटिकल नरेटिव्ह तयार केला जात आहे. हा वैश्विक सोशल मीडिया सर्व राजकीय पक्षांना समान संधी देत नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांनी लोकसभेत हा सवाल केला.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत मीडियाचं स्वातंत्र्य आणि सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीवर आलेल्या संकटाकडे संसदेचं लक्ष वेधलं. भारतीय जनसमूहाला प्रभावित करण्यासाठी एक उद्योग समूह पुढे आल्याचा एक न्यूज रिपोर्टही आला होता. त्यातच आज सोनिया गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा लावून धरला. सोनिया गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेते निशिकांत दुबे यांनी पलटवार केला आहे. काश्मीर मुद्द्यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचं काम झालं होतं. त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत शून्य प्रहारात महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली. महागाईमुळे सामान्य माणूस पिचला आहे. सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी महागाई रोखण्याकरिता उपयायोजना करण्यात याव्यात, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
I urge the Govt to put an end to the systematic influence & interference of Facebook & other SM giants in the electoral politics of world’s largest democracy.
We need to protect our democracy & social harmony regardless of who is in power.
– Congress President Smt. Sonia Gandhi pic.twitter.com/BzPr4bd5ip
— Congress (@INCIndia) March 16, 2022
संबंधित बातम्या:
सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छा
TV9 Poll : गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल?; वाचा पोल काय सांगतो?
कोरोनाची चित्तरकथा; चीन-इंग्लंडमध्ये धोक्याची घंटा, तर नाशिकला पावणेदोन वर्षांनी दिलासा!