नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. येत्या 18 सप्टेंबरला हे अधिवेशन सुरु होणार आहे. 18 ते 22 सप्टेंबर या दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात पाच महत्त्वाचे विधेयक मांडले जाणार आहेत. यापैकी ‘एक देश एक निवडणूक’ हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत सूत्रांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्षांचं राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांसोबत फोटोसेशन होणार आहे.
संसदेचं विशेष अधिवेशन हे मोदी सरकारचं शेवटचं अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांचं फोटोसेशन होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचा पंतप्रधानांसोबत फोटोसेशन होणार आहे. शेवटच्या अधिवेशनानंतर फोटोसेशन केलं जातं. त्यामुळे हे अधिवेशन शेवटचं ठरण्याची शक्यता आहे. पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे.