WITT : खेलो इंडिया पासून TOPS पर्यंत, अनुराग ठाकूर यांच्यामुळे देशात ‘स्पोर्ट्स कल्चर’ चे येणार चांगले दिवस

| Updated on: Feb 25, 2024 | 10:16 AM

WITT : देशात अनेक नवीन खेळाडू तयार होत आहेत. केंद्र सरकारच्या 'खेलो इंडिया' कार्यक्रमाला मिळालेल्या यशाचं प्रमुख कारण आहे. TV9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या विशेष कार्यक्रमात क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत.

WITT : खेलो इंडिया पासून TOPS पर्यंत, अनुराग ठाकूर यांच्यामुळे देशात ‘स्पोर्ट्स कल्चर’ चे येणार चांगले दिवस
Follow us on

मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : भारत देश आता खेळांमध्ये देखील उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, विविध जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय खेळांमध्ये भारतातून नवीन खेळाडू उदयास आले आहेत. पुढच्या अनेक वर्षांमध्ये भारतात अनेक खेळाडू तयार होतील. येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या स्पर्धांचं देखील आयोजन केलं जाईल आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाची आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘खेलो इंडिया’ ला सातत्याने यश मिळत आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या विशेष कार्यक्रमात सरकारला त्यात आणखी सुधारणा कशी करायची आहे हे देशाला सांगतील. पहिल्या सिझनच्या यशानंतर ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कार्यक्रमाचा दुसरा सीझन सुरु आहे.

रविवारी 25 फेब्रुवारी पासून राजधानी दिल्लीत तीन दिवस कार्यक्रम सुरु राहणार आहे. कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान देखील उपस्थितीत राहणार आहेत. एवढंच नाही, इतर देशांमधील अन्य दिग्गज व्यक्ती देखील चर्चेत उपस्थित राहतील आणि प्रेक्षकांना अनेक गोष्टी समजावून सांगतील.

कार्यक्रमात खेळांबद्दल देखील चर्चा होणार आहे. ज्यामध्ये खुद्द अनुराग ठाकुर देखील ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमावर बोलतील. सांगायचं झालं तर, पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये 2017-18 मध्ये भारत सरकारने ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाची सुरुवात केली. भारतात खेळ संस्कृतीचा प्रचार आणि देशातील लहान – लहान शहरे, गावांमधील स्पर्धकांना मंच देण्यासाठी ‘खेलो इंडियाची’ स्थापना करण्यात आली.

2021 मध्ये क्रीडा मंत्रालयाचा पदभार स्वीकारणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची परिस्थिती आणखी सुधारली आहे. नुकतेच अनुराग ठाकूर यांनी स्वतः सांगितलं होतं की खेलो इंडिया अंतर्गत 3000 कोटी रुपये खर्चून देशात 300 हून अधिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.

स्वतः प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असलेले क्रीडामंत्री ठाकूर यांना खेळाचे महत्त्व कळते आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग देशातील युवा खेळाडूंकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांसाठी भारतीय खेळाडू रवाना होण्यापूर्वी खुद्द क्रिडामंत्री विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रोत्साहन देताना दिसले आहेत.

TOPS मधून खेळाडूंची काळजी घेतली जाते…

अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील क्रीडा मंत्रालय ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांची ओळख करून त्यांच्या तयारीसाठी भरपूर पैसा खर्च करत आहे. यासाठी टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम म्हणजेच ‘टॉप्स’च्या माध्यमातून परदेशातील प्रशिक्षणापासून ते जागतिक दर्जाचे कोचिंग आणि 25,000 रुपये मासिक भत्ताही खेळाडूंना दिला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये अनुराग ठाकूर यांच्यामुळे देशात ‘स्पोर्ट्स कल्चर’ चे चांगले दिवस येणार आहेत.