रांची, दि. 6 जानेवारी 2024 | कुत्रा हा जितका निष्ठावान आहे तितका धोकादायक ठरतो. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची उदाहरणे रोजच असतात. काही वेळा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बेवारस कुत्र्याने आई आणि मुलावर केलेला हल्ला दिसत आहे. कुत्र्यापासून मुलाला वाचवताना आईची झालेली धडपड दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये बेवारस कुत्रा एका मुलावर हल्ला करताना दिसत आहे. एक लहान मुलगा आईच्या सोबत रस्त्याने जात आहे. अचानक एक बेवारस कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो. कुत्रा त्या मुलाला आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ती आई मुलास आपल्या कडेवर घेते. परंतु कुत्रा त्या मुलास सोडण्यास तयार होत नाही. उड्या मारुन तो त्याला खेचण्याचा प्रयत्न करतो. या झटपटीत ती आई जमिनीवर पडते. परंतु त्यानंतरही ती हार स्वीकारत नाही. पुन्हा उठून ती लढा देते. व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती धावत येताना दिसत आहे. तो त्या दोघांना वाचवतो. यामुळे दोघांना दिलासा मिळतो.
How scary is this 😥
— Bihar_se_hai (@Bihar_se_hai) January 4, 2024
लोकांनी या व्हायरल व्हिडिओवर अनेक कॉमेंट केल्या आहेत. @Bihar_se_hai नावाच्या खात्यावरुन हा व्हिडिओ शेअर झाला आहे. हा व्हिडिओ 49 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, आईपेक्षा दुसरा कोणताही मोठा योद्धा नाही. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, श्वान प्रेमींनी दोष कोणाचा हे दाखवावे. त्याला दुसऱ्याने उत्तर दिले आहे की काही केले तरी श्वान प्रेमी ऐकणार नाही. एकाने लिहिले आहे श्वानापुढे मानवाच्या जीवनाची किंमत काहीच नाही.