नवी दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने त्यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सुब्रमण्यम स्वामींनी इंधन दरवाढीवरून टीका करताना थेट प्रभू राम, सीता आणि रावणाचा उल्लेख करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (Subramanian Swamy on Petrol Diesel Price in india)
सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे खासदार आहेत. स्पष्टवक्ते म्हणून ते परिचित आहेत. भाजपच्या काळात रेकॉर्ड ब्रेक इंधन दरवाढ झाल्याने त्यांनी भाजवर टीकास्त्र करण्यास सुरुवात केली आहे. सुब्रमण्यम स्वामींनी राम, रावण आणि सीतेच्या जन्मस्थळांचा उल्लेख करून ट्विट करत ही टीका केली आहे. प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत. तर शेजारीच असलेल्या नेपाळ आणि श्रीलंकेत हे दर कमी आहेत, असं स्वामींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले स्वामी?
प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 93 रुपये आहे. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलची 53 रुपये आहे. तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचे भाव 51 रुपये आहेत, असा टोला सुब्रमण्यम स्वामींनी लगावला आहे.
पेट्रोल प्रति लिटर 40 रुपये हवं
डिसेंबरमध्येही स्वामींनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपला घेरले होते. त्यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली होती. यावेळी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपये आहे. पेट्रोलची एक्स रिफायनरी किंमत 30 रुपये प्रति लिटर आहे. त्यावर तेलावर 60 रुपयांचा टॅक्स जोडण्यात आला. खरं तर पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 40 रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं स्वामींनी म्हटलं होतं.
आजचे भाव
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात इंधन दरात 20 ते 25 पैशाने वाढ झाली होती, मात्र, या आठवड्यात इंधनाच्या दरात काहीच बदल झाले नाहीत. इंडियान ऑयलच्या संकेतस्थळानुसार आज मंगळावारी दिल्लीत पेट्रोलचे प्रति लिटर दर 86.30 रुपये आहे. तर मुंबईत प्रति लिटरचा भाव 92.86 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 87.69 प्रति लिटर आहेत. तसेच दिल्लीत डिझेलचे भाव प्रति लिटर 76.48 रुपये, मुंबईत 83. 30 रुपये, कोलकात्यात 80.08 रुपये आणि चेन्नईत 81.71 रुपये एवढे आहेत. (Subramanian Swamy on Petrol Diesel Price in india)
— Subramanian Swamy (@Swamy39) February 2, 2021
संबंधित बातम्या:
पोलिओ डोस देताना झाकण बाळाच्या पोटात, पंढरपुरात आरोग्य कर्मचाऱ्यांची हलगर्जी
Post Budget 2021-22 : सोने-चांदी ते पेट्रोल-डिझेल, काय स्वस्त काय महाग?
क्षणात गुंतवणुकदारांची संपत्ती 4 लाख कोटींनी वाढली, बजेटनंतर Stock Market ने मोडला रेकॉर्ड
(Subramanian Swamy on Petrol Diesel Price in india)