Sudan crisis : Air Force ला सलाम, 121 भारतीयांच्या सुटकेसाठी अंधारात केलं खतरनाक ऑपरेशन

| Updated on: Apr 29, 2023 | 8:28 AM

Sudan crisis : युद्ध सुरु असताना भारतीयांच्या सुटकेसाठी इंडियन एअर फोर्सकडून स्पेशल कमांडोंचा वापर. इंडियन एअर फोर्सने सर्वांनाच हैराण करुन सोडणारं रेस्क्यू ऑपरेशन केलय. एका गर्भवती महिलेसह 121 भारतीयांना घेऊन हे विमान मायदेशी परतलं.

Follow us on

खार्तूम : आफ्रिका खंडातील सूदान या देशात गृहयुद्ध भडकलं आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी सुरु आहे. या ऑपरेशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरत्या मायदेशात आणलं जातय. रिपोर्ट्सनुसार इंडियन एअर फोर्सने आतापर्यंत 1200 भारतीयांना सुरक्षितरित्या मायदेशी आणलय. या ऑपरेशन कावेरी अंतर्गत इंडियन एअर फोर्सने सर्वांनाच हैराण करुन सोडणारं रेस्क्यू ऑपरेशन केलय.

या ऑपरेशनमध्ये इंडियन एअर फोर्साने C-130 हे आपलं ट्रान्सपोर्ट विमान अंधाऱ्या धावपट्टीवर सुरक्षितरित्या उतरवलं. धावपट्टीवर विमानाच्या लँडिंगच्यावेळी लाईट आवश्यक असते. पण IAF च्या पायलट्सनी आपलं कौशल्य दाखवलं. एका गर्भवती महिलेसह 121 भारतीयांना घेऊन हे विमान मायदेशी परतलं.

रात्रीच्या अंधारात काय केलं?

सूदानची राजधानी खार्तूमपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर उत्तर सईदना नावाची एक जागा आहे. या सईदनामध्ये एक छोटीशी धावपट्टी आहे. या रनवेवर दिशा मार्गदर्शन करण्यासाठी ना नेविगेशन, ना लाइटची व्यवस्था होती. मात्र या कठीण परिस्थितीत इंडियन एअर फोर्सच्या पायलट्सनी आपलं सर्वोत्तम कौशल्य दाखवलं. विमानाच सुरक्षित लँडिंग आणि टेक ऑफ केलं. या ऑपरेशनसाठी एअर फोर्सने टेक्नोलॉजीचा वापर केला. त्यांनी नाइट विजन चश्म्यांचा वापर केला. या चश्म्याचा वापर करुन रात्रीच्या अंधारातून मार्ग काढता येते. वृत्तसंस्सथा एएनआयने एअर फोर्सच्या हवाल्याने ही माहिती दिली.

एअर फोर्सने काय सांगितलं?

“27 आणि 28 एप्रिलच्या रात्री एक साहसी ऑपरेशन राबवण्यात आलं. एअर फोर्सने C-130J विमान सईदनाच्या छोट्याशा धावपट्टीवर उतरवलं. तिथून 121 भारतीयांची सुटका केली. यात गर्भवती महिला आणि आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेले नागरिक होते. खार्तूमपासून ही जागा 40 किमी अंतरावर आहे. सुटका केलेल्या नागरिकांकडे सूदानच्या एअरपोर्ट पर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीच कुठलही साधन नव्हतं” असं इंडियन एअर फोर्सकडून सांगण्यात आलं.


मिशनमध्ये IAF कडून कमांडोजचा वापर

ज्या रनवे वर C-130 J लँड करणार होतं, त्याचा पृष्ठभाग खराब होता. नॅविगेशनची सुविधा आणि लँडिंग लाइट्स नसताना विमान उतरवणं धोक्याच असतं. पण एअर फोर्सने यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ करुन दाखवलं. धावपट्टीवर उतरताना एयर क्रू ने इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रा-रेड सेंसरचा वापर केला.

भारताप्रमाणेच टर्कीच विमान सुद्धा आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तिथे आलं होतं. एका गटाकडून गोळीबार सुरु असताना हे विमान फायरिंग रेंजमध्ये आलं होतं. या ऑपरेशनमध्ये इंडियन एअर फोर्सने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या गरुड कमांडोजचा वापर केला.