नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी ते भारतात आहेत. या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते 48 तासात समोर येतील, असं बाली म्हणाले. परमबीर सिंह यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का मानलं जातं आहे. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचं म्हटल्यानं ते परदेशात असल्याचं सांगितलं गेल्याचा दावा खोटा ठरला आहे. परमबीर सिंह समोर आल्यास ते अनिल देसमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह भारतातच असल्याचा दावा पुनीत बाली यांनी कोर्टात केला. ते फरार नाहीतय मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे परमबीर सिंह समोर येत नाहीत.परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे. या खटल्याचा तपास सीबीआय कडून व्हावा, अशी मागणी परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. जर मी चूक केली असेल तर माझ्यावर देखील कारवाई व्हावी, असं सिंह यांच्यावतीनं सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं.
Breaking: Supreme Court Grants Interim Protection To #ParamBirSingh, Court says he shall not be arrested@MumbaiPolice @CPMumbaiPolice https://t.co/JvRSKacyTq
— Live Law (@LiveLawIndia) November 22, 2021
परमबीर सिंह यांनी पाठवलेले पत्र मागे घ्यायला सांगितलं गेलं आणि गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहायला सांगितलं. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.
इतर बातम्या:
गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस मज्जाव, अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर आदेश
Supreme Court Grants Interim Protection To ParamBir Singh said he shall not be arrested Mumbai Police and CBI till 6 December