पुन्हा लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे, शिवसेना कोणाची आजपासून सुनावणी

| Updated on: Feb 14, 2023 | 9:37 AM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी १४ फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होत आहे. शिंदे गट व ठाकरे गटाची याचिका यादीत असून त्यावर सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.

पुन्हा लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे, शिवसेना कोणाची आजपासून सुनावणी
Image Credit source: supreme_court
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणी आता १४ फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होत आहे. शिंदे गट व ठाकरे गटाची याचिका यादीत असून त्यावर सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी घटनापीठाची स्थापना केली आहे. त्यात सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड व न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिम्हा यांचा समावेश आहे.

7 महिन्यांपासून सत्तासंघर्ष

हे सुद्धा वाचा


राज्यात गेल्या 7 महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपसोबत शिंदे यांनी सरकार स्थापन केले. त्याविरोधात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यासह इतर मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे 30 जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर केला आहे. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय घ्यावा. तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

यापुर्वी काय झाले


२०१६ च्या अरुणाचल प्रदेशच्या नबाम रबिया खटल्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्या खटल्याचा निकाल पाच न्यायमूर्तींच्या पीठाचा होता. अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील स्थिती वेगळी असल्याने या मुद्द्यावर अधिक खल व्हावा हा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे.

ठाकरे गटाची काय मागणी

सर्वोच्च न्यायालयाने सात सदस्यीय घटनापीठाची स्थापना करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे सात सदस्यीय घटनापीठ स्थापन झाले आणि सर्व याचिका या घटनापीठाकडे सोपवल्यास सत्तासंघर्षांबाबतची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण यासाठी सात सदय्यांचे घटनापीठ स्थापन होईल. त्यानंतर याचिका त्यांच्यासमोर जातील. सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून भरत गोगावले तर उद्धव ठाकरे गटातर्फे शिवसेना नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी वेगवेगळ्या याचिका सादर केल्या आहे.