नवी दिल्ली – मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अडचणीत सापडलेल्या भापाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma)यांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला आहे. नुरूप शर्मा यांना अटक करण्याची (arrest)मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही सूचना केली आहे. कोर्टाने सांगितले की- अशी याचिका करताना सरळ वाटते, पण याचे दूरगामी परिणाम होतात. आमचा सल्ला आहे की ही याचिका मागे घ्यावी.
26 मे रोजी वृत्तवाहिनीवर नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशात वाद आणि हिंसाचार उफाळला होता. अनेक मुस्लीम देशांनीही याचा विरोध नोंदवला होता. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांच्यापासून अंतर राखत त्यांना पक्षातून निलंबित केले होते.
SC denies to entertain plea seeking Nupur Sharma’s arrest
Read @ANI Story | https://t.co/YSJuh5Ws24#NupurSharma #SupremeCourt pic.twitter.com/bTHgIKBsI5
— ANI Digital (@ani_digital) September 9, 2022
या प्रकरणी 19 जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळीही कोर्टाने 10ऑगस्ट पर्यंत नुपूर शर्मा यांची अटक रोखली होती. या प्रकरणी कोर्टाने 8 राज्य सरकारे आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली होती. नुपूर शर्मा यांच्याविरोधात कोणतीही शिक्षेची कारवाई करु नका, असे निर्देश देण्य़ात आले होते.
त्यापूर्वी 1 जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना चांगलेच फटकारले होते. पैगंबर यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात जी हिंसा झाली, त्याला तुम्ही एकट्या जबाबदार आहात, असे कोर्ट म्हणाले होते. नुपूर यांनी टीव्हीवर घर्माविरोधात चिथावणी देणारे वक्तव्य केले असल्याचेही कोर्टाने म्हटले होते.
नुपूर यांनी लोकांच्या भावना भडकावल्या आहेत आणि देशात जोही हिंसाचार सुरु आहे त्याला एकमेव नुपूर याच जबाबदार आहेत, असेही कोर्टाने सांगितले होते. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचे कार्य नुपूर यांनी केले आहे. असेही निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते. लोकांचा राग अनावर झाल्यावर नुपूर यांनी मागितलेली माफी हीही अटींवर होती, यातून त्यांची जिद्द आणि घमेंड दिसते, अशी टिप्पणीही कोर्टाने केली होती.
नुपूर एका पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, यानी काय फर पडणार आहे. सत्तेचे समर्थन असल्याने, कायद्याच्या विरोधात जाऊन काहीही वक्तव्य त्या करीत असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असेही कोर्टाने त्यावेळी म्हटले होते.
27 मे रोजी टीव्ही चॅनेलवर नुपूर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच काही इस्लामिक देशांनीही याबाबत केंद्र सरकारकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.