दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांचे नाव निश्चित झाले. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. आता विद्यामान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजीनामा देणार असून त्यांच्या ऐवजी आतिशी मारलेना मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेणार आहेत. परंतु त्यापूर्वी आतिशी मारलेना या वादात अडकल्या आहेत. त्यांच्यावर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मोठा आरोप केला. स्वाती यांनी आतिशी यांच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. आतिशी यांच्या आई-वडिलांनी दहशतवादी अफजल गुरु याला फाशीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले, असा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे.
स्वाती मालीवाल यांनी X वर ट्विट करत म्हटले आहे की, दिल्लीसाठी आज दु:खद दिवस आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होणार आहे. त्यांच्या परिवाराने अफजल गुरु याला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढाई लढली. त्यांच्या आई-वडिलांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून अफजल गुरुला वाचवण्याचा प्रयत्न केले. अफजल गुरु निर्दोष आहे, तो एक राजकीय कटाचा भाग आहे, असे आतिशी यांच्या आई-वडिलांनी म्हटले. आम्हाला माहिती आहे की आतिशी एक डमी मुख्यमंत्री असणार आहे. एक कट्टपुतली असणार आहे. पण दिल्लीसाठी हा वाईट दिवस आहे. ईश्वराने दिल्लीवासियांना अशा मुख्यमंत्र्यांपासून वाचवावे…
दिलीप पांडे यांनी स्वातीवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, आपकडून राज्यसभा सदस्यत्व स्वाती मालीवाल यांनी घेतले. आता त्यांना भाजप जे स्क्रीप्ट लिहून देत आहे, ती वाचत आहेत. त्यांनी आधी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. त्यांनी आता भाजपकडून राज्यसभेचे तिकीट घेण्याचा प्रयत्न करायला हवे.
#WATCH | Delhi: AAP Rajya Sabha MP Swati Maliwal says, "This is an extremely unfortunate day for Delhi. A woman like Atishi is going to become the CM of Delhi, whose own family fought a long battle to save terrorist Afzal Guru from death penalty. Her parents wrote mercy petitions… pic.twitter.com/Tr1Qgvq54C
— ANI (@ANI) September 17, 2024
अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी उपराज्यपालांकडे देणार आहे. त्यानंतर आतिशी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. केजरीवाल दुसऱ्यांदा राजीनामा देत आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवली होती. परंतु केवळ 49 दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.