चेन्नई | 2 डिसेंबर 2023 : लाच प्रकरणाचा थरार समोर आला आहे. राज्यात केंद्र सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयातील (ED ) तामिळनाडूमधील एका अधिकाऱ्याचे लाचेचे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूमधील या अधिकाऱ्याने तब्बल तीन कोटी रुपयांची लाच मागितली. लाचेसाठी सेटेलमेंट झाले. मग ठरलेल्या रक्कमेचा पहिला हप्ता देण्यात आला. लाचेचा दुसरा हप्ता घेताना मात्र थरार घडला. तामिळनाडू पोलिसांनी त्या अधिकाऱ्यास पकडण्यासाठी आठ किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. शेवटी लाच घेताना रंगेहात पकडले. अंकीत तिवारी असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
२९ ऑक्टोंबर रोजी एका प्रकरणासाठी एका डॉक्टराने अंकीत तिवारी याच्याशी फिर्यादीने संपर्क केला. त्यावेळी तिवारी याने त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची लाच मागितली. शेवटी ५१ लाख रुपयांमध्ये सेटलमेंट झाली. ५१ लाखे रक्कमेतील पहिला हप्ता देण्यात आला. दुसरा २० लाख रुपयांचा हप्ता देताना थरार घडला. तामिळनाडू पोलिसांनी तिवारी याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. त्याच्यावर पाळत ठेवली गेली. शेवटी आठ किलोमीटरपर्यंत त्याचा गाडीचा पाठलाग करुन त्याला रंगेहात पडकण्यात आले.
अंकीत तिवारीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. साध्या कपड्यांमध्ये मध्य प्रदेश पासिंग असलेली गाडी घेऊन तामिळनाडू पोलीस थांबले. लाचेची रक्कम घेतल्यानंतर तिवारी निघाला. त्याची गाडी थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. परंतु तो सुसाट निघाला होता. टोल प्लॉजावर त्याच्या गाडीला रोखण्यासाठी सूचना करण्यात आली. शेवटी टोल प्लॉजावर अंकीत तिवारी याच्या गाडीला घेरण्यात आले. त्याच्या गाडीतून २० लाख रुपये जप्त करण्यात आले.
अंकीत तिवारी याला लाच घेताना पकडल्यानंतर त्याचा कार्यालयात पोलीस पोहचले. त्यांनी त्याच्या कार्यालयात तपासणी केली. तसेच त्याच्या घराची तपासणी सुरु करण्यात आली आहे. अंकीत तिवारी ईडीच्या मुदराई कार्यलयात कार्यरत आहे.