नवी दिल्ली : टॅक्स चोरीच्या प्रकरणात अटक असलेला व्यापारी पियुष जैन याने न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे. जैन याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ट्रॅक्स चोरी आणि दंड असा मिळून माझ्यावर 52 कोटी रुपयांचा टॅक्स आहे. डायरेक्टरेट ऑफ जीएसटी इंटेलिजेंसने ( डीजीजीआयने) जप्त केलेल्या पैशांमधून 52 कोटी रुपयांची कपात करावी आणि बाकीचे पैसे मला परत देण्यात यावेत. पियुष जैन याला कर चोरी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो कानपूरमधील जेलमध्ये आहे.
डीजीजीआयचे वकील अंबरीश टंडन यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले की, पियुष जैन याच्या घरातून जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम ही टॅक्स चोरीची आहे. जैन याच्या घरातून पैशांनी भरलेले 42 बॉक्स जप्त करण्यात आले होते. 177 कोटी 45 लाख एवढी ही रक्कम आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली आहे. दोन टप्प्यात ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पियुष जैन यांने न्यायालयाला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये त्यांने म्हटले आहे की, आपल्यावर टॅक्स चोरी प्ररणात 52 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात यावा, व उर्वरीत रक्कम मला परत मिळावी.
कानपूरमधील व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर तीन दिवसांपूर्वी छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये कोट्यावधीची बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच मोठ्याप्रमाणात सोन्या, चांदीचे दागीने आणि काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याची अनेक तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. तो सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
IPS Ankita Sharma | अभिनेत्री रवीना टंडणने का केलं IPS अंकिता शर्माचं कौतुक?
Delhi Crime: दिल्लीत आणखी एका महिलेवर गँगरेप; दोघा नराधमांना अटक
Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार