‘तेजस’ हे भारताच स्वदेशी बनावटीच फायटर विमान आहे. गुरुवारी बंगळुरुमध्ये तेजसच एडवांस वर्जन LCA मार्क 1A ने पहिल्यांदा उड्डाण केलं. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने या विमानाची निर्मिती केलीय. LCA मार्क 1A ने 15 मिनिटासाठी उड्डाण केल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. HAL चे चीफ टेस्ट पायलट (फिक्स्ड विंग) ग्रुप कॅप्टन (रिटायर्ड) केके वेणुगोपाल यांनी हे विमान उडवलं. बंगळुरुच्या DRDO लॅब एयरोनॉटिकल डेवलपमेंट एजेंसीने LCA मार्क 1A डेवलप केलय. हिन्दुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड या फायटर जेटची निर्मिती करत आहे.
इंडियन एअर फोर्ससाठी 46,898 कोटी रुपये खर्चून 83 तेजस मार्क 1 A फायटर विमानांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी HAL ला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलय. HAL मार्च 2024 ते फेब्रवारी 2028 दरम्यान या विमानांची डिलीवरी करेल. या फायटर विमानाची ताकद समजून घेऊया.
नव्या तेजसच वैशिष्ट्य काय?
तेजसच नवीन वर्जन खूप एडवांस तसच घातक आहे. नवीन वर्जनमध्ये डिजिटल फ्लाय बाय वायर फ्लाइट कंट्रोल कॉम्प्युटर आहे. या विमानातील अनेक गोष्टी कॉम्प्युटर कंट्रोल करणार आहे. यामुळे पायलटच काम अधिक सोप होणार असून विमान अजून चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल.
स्पीड काय असेल?
ही अशी सिस्टिम आहे, ज्याने रडार, एलिवेटर, फ्लॅप्स आणि इंजिन कंट्रोलमध्ये रहात. सोप्या भाषेत समजायच झाल्यास विमान आधीपेक्षा अधिक सुरक्षित झालय. यात स्मार्ट मल्टी-फंक्शन डिस्प्ले, एडवांस्ड इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे (AESA) रडार, एडवांस्ड सेल्फ-प्रोटेक्शन जॅमर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट सारखी सिस्टिम आहे. 2200 किलोमीटर प्रतितास स्पीडने उडणाऱ्या या फायटर एअरक्राफ्टची लांबी 43.4 फूट आहे.
किती सुधारणा केल्यात?
तेजसच्या एडवांस वर्जन LCA मार्क 1A मध्ये जवळपास 40 सुधारणा करण्यात आल्या आहेत. LCA मार्क 1A मध्ये मिड एयर रिफ्यूलिंगची क्षमता आहे. म्हणजे हवेतच या मध्ये इंधन भरता येईल. या फायटर एयरक्राफ्टमध्ये अपग्रेडेड रडार वॉर्निंग रिसीवर सिस्टमचा (RWR) वापर करण्यात आलाय. म्हणजे एयरक्राफ्टला असलेला धोका लगेच समजेल.
किती हजार फूट उंची गाठेल?
या एयरक्राफ्टमध्ये 9 हार्ड पॉइंट्स आहेत. यात रॉकेट, मिसाइल आणि बॉम्ब फिट करता येऊ शकतात. शत्रूचा भाग उद्धवस्त करता येईल. उंचीच्या दृष्टीने सुद्धा हे विमान खास आहे. नवीन LCA मार्क 1A जास्तीत जास्त 50 हजार फूटाची उंची गाठून हल्ला करु शकतो.