हैदराबाद : कधी कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही. विमान (Plane) प्रवासादरम्यान एका प्रवाश्यासोबत एक घना घडली. त्याला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला. विमान हवेत होतं. त्यामुळे या एका प्रवाशाला रुग्णालयात नेणं शक्य नव्हतं.त्यामुळे ‘या विमानात कुणी असं आहे का की जे रुग्णावर उपचार करू शकतील? असतील तर कृपया आमची मदत करा’, अशी अनाऊन्समेंट झाली. या विमानात तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan) प्रवास करत होत्या. त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी तात्काळ आपल्या जागेवरून उठत त्या रूग्णाजवळ गेल्या. अन् त्यांनी या रूग्णावर उपचार केले. अन् या प्रवाश्याचा जीव वाचला.
दिल्ली-हैदराबाद फ्लाइटमध्ये शनिवारी एक घटना घडली.तेलंगणाच्या राज्यपाल सुंदरराजन या विमानात प्रवास करत होत्या. राजकारणात येण्याआधी त्यांनी डॉक्टर म्हणून काम केलं आहे. त्यामुळे जेव्हा विमानात प्रवासादरम्यान आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा त्या पुढे आल्या आणि त्यांनी या प्रवाश्याचे प्राण वाचवले.
1994 च्या बॅचचे आयपीएस आणि डीजीपी रँकचे अधिकारी कृपानंद त्रिपाठी उजेला हे देखील विमानात प्रवास करत होते. त्यांना अचानकपणे त्रास जाणवू लागला. अन् तमिलिसाई सुंदरराजन यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला. “विमानप्रवासात अचानकपणे मला त्रास होऊ लागला. यावेळी तमिलिसाई सुंदरराजन यांनी माझी तपासणी केली. तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके फक्त 39 होते. त्याने मला पुढे वाकायला सांगितलं आणि काहीवेळ तसंच बसून राायला सांगितलं. त्यामुळे माझा श्वासोच्छ्वास स्थिर झाला. त्या फ्लाइटमध्ये नसत्या तर कदाचित मी वाचू शकलो नसतो. त्यानी मला नवीन जीवदान दिलंय. त्यांचे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही”, असं कृपानंद त्रिपाठी उजेला म्हणालेत. उजेला यांनी सुंदरराजन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हैदराबादमध्ये उतरल्यानंतर लगोलग त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.