6 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, नराधमाला पकडून गोळ्या घालू, मंत्र्याचा आक्रमक पवित्रा

| Updated on: Sep 15, 2021 | 12:01 PM

तेलंगाणामध्ये ( Telangana Rape Case) एका 6 वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. यामुळे सगळ्या राज्यभर रोषाचं वातावरण आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहे. दरम्यान, फरार आरोपींना पकडून त्यांना गोळ्या घालू ( Encounter of the accused) असा आक्रमक पवित्रा तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी ( Chamakura Malla Reddy) यांनी घेतला आहे.

6 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, नराधमाला पकडून गोळ्या घालू, मंत्र्याचा आक्रमक पवित्रा
Malla reddy
Follow us on

हैदराबाद: तेलंगाणामध्ये ( Telangana Rape Case) एका 6 वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. यामुळे सगळ्या राज्यभर रोषाचं वातावरण आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहे. दरम्यान, फरार आरोपींना पकडून त्यांना गोळ्या घालू ( Encounter of the accused) असा आक्रमक पवित्रा तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी ( Chamakura Malla Reddy) यांनी घेतला आहे. दरम्यान, आरोपींवर राज्य सरकारने 10 लाखांचं बक्षीस ठेवलं आहे. (Telangana rape case: Minister Chamakura Malla Reddy says we will catch the accused and encounter them )

घटना नेमकी कशी घडली?

तेलंगानामध्ये सैदाबाद आहे…इथं राहणाऱ्या 6 वर्षीय चिमुरडीचं 9 सप्टेंबरला त्यांच्या बाजूला राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमानं अपहरण केलं. संध्याकाळी 5 नंतरही मुलगी घरातून गायब झाल्यानंतर तिचा शोध सुरु झाला. त्यानंतर मध्यरात्री ही मुलही शेजारच्या घरात मृतावस्थेत आढळली. या घटनेनंतर पल्लकोंडा राजू या आरोपी फरार आहे. या आरोपीने बलात्कारानं तिची हत्या केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

आरोपीला पकडण्यासाठी 10 लाखांचं बक्षीस

दरम्यान पल्लकोंडा राजू या आरोपीला पकडण्यासाठी तेलंगाणा पोलिसांनी 15 पथकं तयार केली आहे. ही पथकं विविध भागांमध्ये पाठवण्यात आली आहेत. शिवाय, या आरोपीला पकडवून देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असंही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर जनतेत रोष पाहायला मिळतो आहे. घटनेची पाहणी करण्यासाठी जेव्हा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं, तेव्हा स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचंही समोर आलं आहे.

नराधमाला पकडल्यानंतर गोळ्या घालू- मंत्री

दरम्यान, तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. आरोपीचं एन्काऊंटर केलं जाईल असं थेटपणे त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. रेड्डी म्हणाले की, ‘ या चिमुरडीसोबत वाईट कृत्य करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाचं एन्काउंटरच व्हायला हवं. आम्ही आरोपीला पकडून त्याचं एन्काऊंटर करुन टाकू, आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत आणि त्यांची शक्य तितकी मदत करु’ दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ओळखण्यासाठी काही खुणा प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यात आरोपी 30 वर्षांचा असून त्याची उंची 5 फूट 9 इंच आहे. त्याचे केस लांब आहे आणि त्याच्या हातावर टॅटू बनलेला आहे. हा आरोपी बऱ्याचदा गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळतो.

याआधीही गँगरेप करणाऱ्यांचं झालं आहे एन्काऊंटर

तेलंगाणा पोलिसांनी याआधीही गँगरेप करणाऱ्या 4 आरोपींचं एन्काऊंटर केलं होता. 27 नोव्हेंबर 2019 ची ही घटना आहे, ज्यावेळी एका पशू चिकित्सक मुलीसोबत 4 जणांनी गँगरेप केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींची माहिती मिळवली, आणि 6 डिसेंबर 2019 ला शादनगरजवळ चारही आरोपींचं एन्काऊंटर केलं. याला दिशा एन्काऊंटर म्हटलं गेलं, ज्यावर नंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, 6 संशयित ताब्यात, महाराष्ट्रही टार्गेटवर !