Marathi News National Terrorist arrested for attacking Indian Army post, sent by Pakistani colonel, Indian soldiers donate blood to save terrorist's life
Indian Army: लष्कराच्या पोस्टवर हल्ला करण्यासाठी आलेला दहशतवादी अटकेत, दहशतवाद्याचा जीव वाचवण्यासाठी भारतीय सैनिकांनी दिले रक्त
21 ऑगस्ट रोजी दहशतवादी तबारक हुसैन चार ते पाच साथीदारांसह सीमेवरील नियंत्रण रेषा पार करण्याच्या प्रयत्नात होता. भारतीय लष्कराच्या चौकीजवळ तार कापत असताना भारतीय सैन्यातील जवानांनी त्याला पाहिले. भारतीय जवानांनी त्याला आवाज दिला, त्यानंतर तबराक पळून जाण्यचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर गोळीबारात तो जखमी झाला त्यानंतर त्याला जिवंत पकडण्यात आले. त्याचे इतर साथीदार घनदाट जंगलात पळून गेले.
पाकिस्तानी दहशतवाद्याा जिवंत पकडले
Image Credit source: social media
Follow us on
जम्मू – एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani terrorist) भारतीय सैन्याने अटक (arrested)केली आहे. या दहशतवाद्याच्या अटकेनंतर त्याने मोठे गौप्यस्फोट केले आहेत. या दहशतवाद्याने सांगितले आहे की, एका पाकिस्तान कर्नलने भारतीय लष्कराच्या पोस्टवर हल्ला करण्यासाठी त्याला 30 हजार पाकिस्तानी रुपये (30 thousand Pakistani rupees) म्हणजे 10890 भारतीय रुपये दिले होते. त्याने व्हिडीओ शूटिंगच्या दरम्यान हे कबून केले आहे. आता हा व्हिडीओ सैन्यदलाने वृत्तसंस्थांना दिला आहे. या दहशतवाद्याला यापूर्वीही एकदा भारतीय सैन्यदलाने पकडले होते. यावेळी राजौरीत लाईन ऑफ कंट्रोलवर घुसखोरी करत असताना त्याला अटक करण्यात आलेली आहे.
Captured terrorist confesses on camera Pakistan army’s role in terrorism in J&K
मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी दहशतवादी तबारक हुसैन चार ते पाच साथीदारांसह सीमेवरील नियंत्रण रेषा पार करण्याच्या प्रयत्नात होता. भारतीय लष्कराच्या चौकीजवळ तार कापत असताना भारतीय सैन्यातील जवानांनी त्याला पाहिले. भारतीय जवानांनी त्याला आवाज दिला, त्यानंतर तबराक पळून जाण्यचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर गोळीबारात तो जखमी झाला त्यानंतर त्याला जिवंत पकडण्यात आले. त्याचे इतर साथीदार घनदाट जंगलात पळून गेले. त्यानंतर जखमी तबराक याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पाकिस्तानी असल्याचे कबूल केले आहे. पाकिस्तानच्या कोटली जिल्ह्यातील रहिवाली असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या चौकशीत भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना त्याने सांगितली.
1 ते 2 फ़ॉरवर्ड पोस्टची केली होती रेकी
तबारकने सांगितले की पाकिस्तानी कर्नल युनूस चौधरी यांनी त्याला हल्ला करण्यासाठी पाठवले होते. त्यासाठी त्याला 30 हजार पाकिस्तानी रुपये देण्यात आले होते. तबराकने त्याच्य साथीदारांसह एक ते दोन फॉरवर्ड पोस्टची रेकीही केली होती. संधी मिळावल्यानंतर लागलीच हल्ला करण्याचे त्यांची प्लॅनिंग होते. ज्या दिवशी त्याला अटक झाली, त्याच दिवशी चौकी उध्वस्त करण्याचे टार्गेट त्याला कर्नकडून देण्यात आले होते.
2016 मध्येही तबराकला करण्यात आली होती अटक
तबराकला 2016 सालीही याच परिसरातून लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यावेळी तो त्याचा भाऊ हारुन अली याच्यासोबत आला होता. त्यावेळी मानवतेच्या आधारावर त्याला सोडण्यात आले होते. नोव्हेंबर 2017 साली त्याला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आले होते.
घुसखोरीच्या घटनांत वाढ, 22-23 ऑगस्ट रोजी दोन दहशतवाद्यांचा खात्मा
22-23 ऑगस्ट रोजी दुसऱ्या एका ऑपरेशनमध्ये नौशेराच्या लेम सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. जवान त्यांच्यावर नजर ठेवून होते. जसेही हे तीन दहशतवादी लाईन ऑफ कंट्रोल पार करुन आले, त्यावेळी माईन्स एक्टिव्ह झाली. यावेळी झालेल्या स्फोटात २ दहशतवाद्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तिसरा दहशतवादी जखमी होता, मात्र खराब हवामानाचा फायदा घेत तो पळून गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळाले. आता या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात येते आहे. या परिसरात अनेक ठिकाणी लँडमाईन्स पेरण्यात आल्या असल्याने सावधगिरीने हा तपास करण्यात येतो आहे.