भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, जम्मू-काश्मीरमध्ये काय घडलं?

| Updated on: Jan 12, 2024 | 8:58 PM

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. भारतीय सैन्याकडून तातडीने दहशतावद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, जम्मू-काश्मीरमध्ये काय घडलं?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

श्रीनगर | 12 जानेवारी 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये काही केल्या दहशतवादी कारवाई शांत होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. भारतीय सैन्याकडून दशहतवादी कारवायांवर रोख लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. पण तरीही दहशतवादी कारवाया थांबायचं नाव घेताना दिसत नाही. दहशतवाद्यांनी आज पुंछ सेक्टरमध्ये गाडीवर हल्ला केला. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही. या घटनेनंतर तातडीने घाट परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु झालं आहे. विशेष म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुंछ सेक्टरमध्ये वन क्षेत्रात उभ्या असलेल्या भारतीय सैन्याच्या एका वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पण सुदैवाने दहशतवाद्यांच्या या गोळीबारात कुणीही जखमी झालं नाही. दहशतवादी गोळीबार केल्यानंतर तिथून पळून गेले. त्यानंतर भारतीय सैन्याकडून त्यांचा शोध सुरु झाला. भारतीय सैन्याकडून त्यासाठी शोध मोहीम सुरु आहे. पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाट परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

गेल्या महिन्यात दहशतवादी हल्ल्याच 4 जवान शहीद

दरम्यान, गेल्या महिन्यात 21 डिसेंबर 2023 ला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला राजौरी येथे झाला होता. या हल्ल्यात भारतीय सैन्याचे 4 जवान शहीद झाले होते. तसेच 3 जवान जखमी देखील झाले होते. या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये एकच खळबळ उडाली होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर भारतीय सैन्याने रात्रीच्या वेळी पुंछच्या थानामंडी-सूरनकोट येथे शोध मोहीम सुरु केल होती. त्यानंतर दहशतवादी आणि भारतीय सैन्याचे जवान यांच्यात चकमक सुरु झाली होती. या दरम्यान 21 डिसेंबरला दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या 2 वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले होते.