supreme court : ठाकरे गटाची नवी खेळी, सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करणार

| Updated on: May 11, 2023 | 10:44 AM

mla disqualification case : राज्यातील राजकारणात काय होणार आहे, याचा निर्णय आज होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना ठाकरे गटाने पुढची तयारी सुरु केली आहे. ठाकरे गटाकडून नवीन याचिका दाखल करण्यात येणार आहे.

supreme court : ठाकरे गटाची नवी खेळी, सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करणार
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल देणार आहे. या निकालानंतर राज्यातील सत्ताकारण बदलणार आहे की काय? हे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी महत्वाची याचिका आहे. यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या आमदारासंदर्भात निर्णय आल्यानंतर ठाकरे गट नवीन याचिका दाखल करणार आहे.

काय आहे ठाकरे गटाची खेळी

सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवले तर त्यानंतर ठाकरे गटाकडून नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवल्यावर आम्ही नवीन याचिका दाखल करणार आहोत. त्या याचिकेत 24 आमदारांनाही अपात्र ठरवण्याची मागणी करणार आहोत, असे परब यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

तर शिवसेनेतून बाहेर गेलेले सर्व अपात्र

शिवसेनेतून फुटून बाहेर गेलेले सर्व ४० आमदारांची आमदारकी रद्द करण्याची खेळी ठाकरे गटांकडून करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सरकार कोसळणार असून राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास शिवसेनेची खेळी यशस्वी होईल.

या 16 आमदारांवर टांगती तलवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (आमदार, कोपरी-पांचपाखाडी) तानाजी सावंत (आमदार, भूम परंडा) अब्दुल सत्तार (आमदार, सिल्लोड) यामिनी जाधव (आमदार, भायखळा) संदीपान भुमरे (आमदार, पैठण) भरत गोगावले (आमदार, महाड) संजय शिरसाठ (आमदार, छत्रपती संभाजीनगर पश्चिम) लता सोनावणे (आमदार, चोपडा) प्रकाश सुर्वे (आमदार, मागाठाणे) बालाजी किणीकर (आमदार, अंबरनाथ) बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड उत्तर) अनिल बाबर (आमदार, खानापूर) संजय रायमूलकर (आमदार, मेहेकर) रमेश बोरनारे (आमदार, वैजापूर) चिमणराव पाटील (आमदार, एरोंडोल) महेश शिंदे (आमदार, कोरेगाव)

हे होते न्यायमूर्ती देणार निकाल

खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी एस नरसिंहा हे न्यायमूर्ती निकाल देणार आहे. पाच जणांच्या या खंडपीठामधील न्यायमूर्ती शाहा या आठवड्यात निवृत्त होत आहे.