मुंबई : उत्तर प्रदेश (Utter Pradesh) निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभा (Assembly)निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरू होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या राज्यात प्रचारही धडाक्यात सुरू आहे. यामध्ये एक गाणं सध्या सर्वत्र ऐकायला मिळतंय, ते म्हणजे मनिके मागे हिते(Manike Mage Hithe). काय आहे खास, जाणून घेऊ या…
प्रचारगीताच्या उद्देशानं…
तुम्ही म्हणाल, हे गाणं तर एका श्रीलंकन गायिकेनं त्यांच्या भाषेत गायलंय. त्या गाण्याचे विविध व्हर्जन्सही आपण ऐकले असतीलच. आता यूपी एलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मात्र गायिकाही वेगळी आहे आणि गाण्याचे शब्दही निराळे. हे गाणं वापरलंय प्रचारगीताच्या उद्देशानं…
When the version of manike mage hithe for pronoun party is releasing?
Please make amrita mam sing that song! @AishwaryakiRai @RDX_bhaupic.twitter.com/lrtqqDytFh— Solutions Architect (@SolutionsArch1) January 16, 2022
सोशल मीडियावर ट्रेंड
हिंदी भाषेत या गाण्याच्या चालीत एक प्रचारगीत तयार करण्यात आलंय. जवळपास 1 मिनिट 46 सेकंदाचं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यूपी में पुरे किये, जनतासे किए हुए, वादे… असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या हे गाणं ट्रेंडिंग असून यूझर्सही यावर कमेंट्स करतायत.
Sensational Sri Lankan song Manike Mage Hithe now part of India’s election campaign.
? BJP’s poll anthem for Uttar Pradesh Assembly Elections.pic.twitter.com/OewkS9FlI7 #LKA #SriLanka #India #MenikeMageHithe @yohanimusic @BJP4India— Sri Lanka Tweet ?? ? (@SriLankaTweet) January 16, 2022
‘…ही तर श्रीलंकेसाठी अभिमानाची बाब’
एकानं लिहिलंय, की श्रीलंकन गायिका योहानीचं ‘मनिके मागे हिते’ आता भारताच्या निवडणूक कॅम्पेनचा एक भाग झालंय. एका यूझरनं म्हटलंय, फायनली समजला मनिके मागे हिते या गाण्याचा अर्थ. तर आणखी एकानं म्हटलंय, की योहानीचं हे सुप्रसिद्ध गाणं नरेंद्र मोदी, भाजपानं निवडणुकीसाठी वापरणं म्हणजे श्रीलंकेसाठी अभिमानाची बाब आहे. काहीजण म्हणतायत, योहानीचं हे बीजेपी व्हर्जन आहे.