राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देत आहेत. पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उभे राहताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, खोटे नरेटिव्ह पसरवून देखील विरोधकांचा पराभव झाला. भारताच्या जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. ही खूपच गौरवाची गोष्ट आहे. जनतेने आमच्या १० वर्षाचे कामकाज पाहिले आहे. गरिबांच्या कल्याणासाठी आम्ही जनसेवा हीच प्रभुसेवा हा मंत्र लक्षात ठेवून काम केले आहे. यामुळे करोडो लोकं गरिबीतून वर आले आहेत. २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही सत्तेत आलो तेव्हा आम्ही सांगितले होते की, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही झिरो टॉलरेन्स निती अवलंबणार आहे. देशाने त्यासाठी आम्हाला पुन्हा आशिर्वाद दिला आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताचा गौरव होत आहे. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलला आहे.
देशाच्या जनतेने पाहिलंय की, आमची प्रत्येक निती, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कार्य एकच तराजू राहिला आहे तो म्हणजे भारत प्रथम. देशाच्या सगळ्या लोकांच्या कल्याण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्ही देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. देशाने तृष्टीकरणाचे राजकारण पाहिले. पण देशात पहिल्यांदा सेक्युलरिझमचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. देशात आम्ही संतुष्टीकरण केले. प्रत्येक योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. हाच सामाजिक न्याय आहे.
दहा वर्षात आम्ही केलेल्या कामांमुळे देशाने पुन्हा एकदा आम्हाला समर्थन दिले आहे. आम्हाला पुन्हा १४० कोटी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भारताची जनता परिपक्व आहे. भारताची जनता विवेकपूर्ण उच्च आदर्श घेऊन बुद्धीचा वापर करते म्हणून तिसऱ्यांदा आम्ही देशाच्या पुढे नम्रतापूर्ण सेवा करण्यासाठी उपलब्ध आहोत. जनतेने आमची नियत पाहिली आहे. या निवडणुकीत आम्ही नव्या संकल्पासोबत जनतेमध्ये गेलो होतो. आम्ही विकसित भारताच्या संकल्पासाठी आशिर्वाद मागितले होते. जनतेने विकसित भारताच्या संकल्पासाठी पुन्हा एकदा आम्हाला सेवेची संधी दिली आहे. जेव्हा देश विकसित होतो तेव्हा करोडो लोकांचं स्वप्न पूर्ण होतात. देश विकसित होतो तेव्हा येणाऱ्या पीढीसाठी एक नीव तयार होते.
जेव्हा विकसित भारत होईल तेव्हा गाव आणि शहरांची स्थिती यात मोठी सुधारणा होते. विकसित भारत म्हणजे कोटी कोटी नागरिकांना अनेक संधी उपलब्ध होतात. मी देशवासियांना विश्वास देतो की, विकसित भारताची जो संकल्प घेऊन आम्ही चालत आहोत ते आम्ही पूर्ण निष्ठेसह पूर्ण करु. विकसित भारताचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही 24X7 काम करु.