कोलकात्यातील आरजी मेडिकल कॉलेज सध्या देशभरातच नव्हे तर जगभर चर्चेत आहे. या मेडिकल कॉलेजात एक 31 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ती आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला. पण नंतर हे प्रकरण तापलं आणि गँगरेपचं प्रकरण समोर आलं. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. देशभरातून निदर्शने होत आहेत. हे निदर्शने सुरू असतानाच आरजी मेडिकल कॉलेजमधील एक रहस्य समोर आलं आहे. यापूर्वीही या मेडिकल कॉलेजात अशा घटना घडल्या होत्या. पण प्रकरणं दाबून टाकण्यात आली होती.
मृत महिला ही ट्रेनी डॉक्टर होती. तिच्या अमानुष हत्येने सर्वांचा थरकाप उडाला आहे. एवढेच नव्हे तर या आरजी कर मेडिकल कॉलेजात यापूर्वी घडलेल्या आशाच घटनांचीही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी अशा घटनांची वाच्यता केली. ते पुन्हा दिसले नाहीत. किमान दोन तीन तरी अशा घटना या कॉलेजात घडल्या आहेत. आता याच कॉलेजातील 24 वर्षापूर्वीची एक घटना चर्चेत आली आहे. या घटनेशी मिळतीजुळती अशीच आहे. 25 ऑगस्ट 2001ची ही गोष्ट आहे. सौमित्र बिश्वास हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये मृत आढळला होता. त्याने गळफास घेतला होता. तो मेडिकलच्या चौथ्या वर्षाला होता. अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. पण सौमित्रच्या कुटुंबीयांना ही घटना संशयास्पद वाटत होती. त्याचे कुटुंबीय कोलकाता हायकोर्टात गेले. तेव्हा कोर्टाने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात फक्त एक विद्यार्थीनी औरोमिता दास हिच्या अटके व्यतिरिक्त या प्रकरणात अजून काही घडलेलं नाही.
सौमित्रच्या आईला या घटनेची आधीच कुणकुण लागली होती. या परिसरात अवैधपणे काही गोष्टी चालत आहेत. त्याची माहिती मिळाल्यानंतर माझ्या मुलाची हत्या करण्यात आली. कसून तपासणी केल्यानंतर या हॉस्टेलमध्ये पोर्नोग्राफी चालवणारी टोळी कार्यरत असल्याचं आढळून आलं होतं. हे लोक सेक्सवर्क करायचेच पण मृतदेहांचं शोषणही करायचे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यामुळेच सौमित्रची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
आरजी मेडिकल कॉलेजात एक आणखी एक प्रकार घडला होता. ट्रेनी पौलमी या 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. ही सुद्धा आत्महत्या असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण कोणतीही सुसाईड नोट सापडली नव्हती. तिच्या मृत्यूबाबतची कोणतीच गोष्ट समोर आली नाही. सौमित्रप्रकरणानंतर पौलामी प्रकरणही असंच दाबलं गेलं. या घटनेतूनही काहीच निष्पन्न झालं नाही.
सौमित्र ज्या हॉस्टेलमध्ये राहायचा. तिथे राहणारा एक विद्यार्थी आज डॉक्टर बनला आहे. आमच्या सर्वांप्रमाणे सौमित्रलाही या प्रकरणाची माहिती होती. पण त्याच्यात आणि आमच्यात कुणालाही आव्हान देण्याची हिंमत नव्हती. सौमित्रच्या एका मित्राला या टोळीने प्रचंड टॉर्चर केलं. त्याचा चेहरा एका दुसऱ्या महिलेच्या नग्न शरीराला जोडला. त्यामुळे त्याची बदनामी झाली. तोही हा प्रकार थांबवू शकला नाही.
या हॉस्टेलमध्ये विकेंडला पॉर्न शुटिंग केली जायची. त्यासाठी वेश्यांना हॉस्टेलमध्ये बोलावलं जायचं. एखाद्यावेळी जर वेश्या आली नाहीतर हॉस्टेलमधील मृतदेहाचा वापर केला जायचा. मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मृतदेहाचा पोर्नोग्राफीसाठी वापर केला जायचा. हे एक मोठं रॅकेट आहे. त्याला राजकारण्यांचा आशीर्वाद आहे. या मृतदेहांच्या नग्न शॉट्सवर मॉडेलचा चेहरा लावला जायचा, असं या डॉक्टरने सांगितलं.
हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर रुम नंबर 15 मध्ये ट्रायपॉड आणि रिफ्लेक्टर सापडल्याने या ठिकाणी पॉर्न व्हिडीओ शूट केले जात असल्याचं पक्कं झालं. मात्र पोलिसांनी या रुमचा तपास करण्यास आधी टाळाटाळ केली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे बाजूच्याच रुममध्ये सौमित्र बिस्वासचा मृतदेह सापडल्यानंतरही या रुममधील ट्रायपॉड आणि इतर साहित्य हटवलं गेलं नाही. त्यावरून सौमित्रच्या मृत्यूनंतरही या टोळीने आपलं काम सुरूच ठेवलं होतं हे स्पष्ट होतं.
काही तरी गडबड झालीय याचे संकेत आधीच मिळत होते. सौमित्रचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या गळ्यात एक रुमाल बांधलेला आढळला. आरजी मेडिकल कॉलेजाशी संबंधित एका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार त्या रुमचा मागचा दरवाजा विचित्र पद्धतीने उघडलेला होता. हा दरवाजा जबरदस्ती उघडल्याचं जाणवत होतं. सौमित्रचा मृतदेह छोट्या दोरीला लटकलेला आढळला. त्यावरून त्याने स्वत:ला संपवलंय असं दिसत नव्हतं. पण तरीही या प्रकरणावर संशय घेतला नाही. विशेष बाब म्हणजे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येही काहीच आढळून आलं नाही. मात्र, अजूनही विसेराचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नाही.
वाढदिवसाच्या पार्टीत सौमित्रने फोटो काढले होते. या फोटोतील त्याचा चेहरा नग्न मृतदेहांना लावण्यात आला होता. त्यानंतर हे बदनामी करणारे फोटो शेअर करण्यात आले होते. ज्यांनी हा प्रकार केला होता, त्यांना सौमित्र भेटला होता. त्याच्याशी त्याने वाद घातला होता. या सर्वांचा पर्दाफाश करण्याची त्याने धमकी दिली होती. त्यामुळेच कदाचित त्याला संपवलं गेलं असावं, असं या डॉक्टरने सांगितलं. सौमित्रच्या आईला मुलाच्या मृत्यूचा दिवस लख्खपणे आठवतोय. सौमित्र बैरकापूर येथील घरातून उठला. त्याने परत दुपारी घरी येऊन जेवणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. तो परत आलाच नाही, असं त्याची आई म्हणतेय.