उदयपूर – एका माणसानं 90 दिवसांत (90 days) तीन लग्न (3 marriage)केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यातल्या दोन बायकांनी या माणसाला सोडून दिलं तर तिसऱ्या पत्नीचा मृत्यू झाला. यामुखे दु:खी झालेल्या या तरुणानं फाशी घेऊन आत्महत्या (Suicide)केली आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांत तीन लग्न करुनही आपल्याला सुख मिळाले नाही, यामुळे हा तरुण तणावात होता, असे सांगण्यात येते आहे. याचमुळे दु:खात असलेल्या या तरुणानं आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते आहे. या तरुणाचा मृतदेह फतहसागर परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. रस्त्यावरील जाणाऱ्य़ा-येणाऱ्यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यांनी झाडावर लटकत असलेला मृतदेह खाली काढला आणि त्यानंतर पोस्टमार्टेमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. मृत तरुणाचे नाव खेमराज असे असून, तो 42 वर्षांचा होता. ऑटो रिक्षा चालवून तो कुटुंबाची गुजराण करीत होता.
मृत खेमराज याच्या मुलाने सांगितले की तो लहान असताना खेमराजची पहिला बायको, त्या दोघांनाही सोडून एका माणसासोबत पळून गेली होती. त्यानंतर खेमराजने काही दिवस लग्न केले नाही. नंतर मात्र त्याने तीन महिन्यांत तीन लग्न केली होती. यातल्या एका पत्नीचा मृत्यू झाला.
तीन महिन्यांत केलेल्या दोन बायका इतर दोन पुरुषांसोबत निघून गेल्याचे खेमराजच्या मुलाने सांगितले. या दोघीही निघून गेल्यानंतर खेमराज जास्त तणावात होत्या. तो कुणाशी फारसा बोलतही नव्हता. यातूनच हताश झालेल्या खेमराजने आत्महत्येचं पाऊल उचललं असेल, अशी शक्यता त्याच्या मुलानं वर्तवली आहे. तर या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासानंतरच खेमराजने आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.