किव्हः रशिया आणि युक्रेन (Rassuia- Ukraine) युद्ध शिगेला पोहोचलं तेव्हा किव्हमधून पोलंड येथे हलवण्यात आलेलं भारतीय दूतावास आता पुन्हा एकदा किव्हमध्ये परतणार आहे. पुढील आठवड्यात किव्हमधूनच (Kyiv)भारतीय दूतावासातील (Indian Embassy) अधिकारी काम सुरु करतील. भारत सरकारतर्फे शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. 13 मार्च रोजी रशिय आणि युक्रेनमधील युद्ध टिपेला पोहोचलं होतं. युक्रेनच्या पश्चिम भागात रशियाकडून सातत्याने हल्ले होत होते. त्यामुळे भारतीय दूतावास पोलंडमधील वॉर्सा येथे हलवण्यात आले होते. आता रशियाचे हल्ले युक्रेनच्या पूर्व भागावर होत असल्याने पुन्हा एकदा किव्ह येथील दुतावास सुरु करण्याची ही योग्य वेळ असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कळवण्यात आलं आहे. अनेक पाश्चिमात्य देशदेखील युक्रेनशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा एकदा किव्हमधून राजनैतिक प्रक्रिया सुरु करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानेदेखील आपल्या दुतावासाचं कामकाज पुन्हा एकदा किव्हमधून सुरु करण्याचं ठरवल्याचं सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यात जप्मनी आणि कॅनडानेही आपलं दूतावास पुन्हा सुरु केलं. दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही किव्हला भेट दिली असून अद्याप त्यांनी अधिकृतरित्या दूतावासाचं कामकाज सुरु केलेलं नाही.
The Indian Embassy in Ukraine, which was temporarily operating out of Warsaw (Poland), would be resuming its operation in Kyiv w.e.f. 17 May 2022. The Embassy was temporarily relocated to Warsaw on 13 March 2022: Ministry of External Affairs (MEA) pic.twitter.com/LklV0NzyqN
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 13, 2022
रशिया – युक्रेनदरम्यान युद्ध संघर्ष वाढल्यानंतर युक्रेनमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाने मोठी कामगिरी केली होती. ऑपरेशन गंगा अंतर्गत 20,000 भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्यात आलं. 26 फेब्रुवारी रोजी सुरु झालेलं हे मिशन यशस्वी झाल्यानंतर 13 मार्च रोजी युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरत्या स्वरुपात पोलंडमधील वॉर्सो येथे हलवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा किव्ह येथून काम करण्याची तयारी भारतीय दूतावास करत असून पुढील आठवड्यात 17 मे पासून हे कार्यालय सुरु होईल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतानाच मायदेशी परतावं लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. युक्रेनमधील एक महत्त्वाची युनिव्हर्सिटी असलेल्या खारकीव्ह नॅशल मेडिकल युनिव्हर्सिटी (KNMU) ने ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे मोठे दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाले असून युक्रेन सरकारकडून विद्यापीठाला मिळणारे वेतन बंद झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं काही वृत्तांमधून सांगण्यात आलं आहे. KNMU विद्यापीठाने विद्यार्थ्यांना यासंदर्भातला ई मेल पाठवला असून मे अखेरीस विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून त्या युक्रेन सरकारच्या शैक्षणिक अॅपवर घेतल्या जातील, असं कळवलं आहे. KNMU विद्यापीठाअंतर्गत 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी दोन हजार विद्यार्थी भारतीय आहेत.